*कोंकण एक्सप्रेस*
*मळगाव येथे १९ रोजी शिवजयंती उत्सव*
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
जाणता राजा, हिंदूस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव बुधवार, १९ फेब्रुवारी साजरा होत आहे. यानिमित्त भिल्लवाडी ग्रुप (अध्यक्ष पांडुरंग राऊळ), मळगाव ग्रामविकास मंडळ, मुंबई व मळगाव ग्रामस्थ यांच्यातर्फे मळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त पहाटे ५ वाजता हनुमंत गड, फुकेरी ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत मशाल रॅली, सकाळी १०.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज अभिषेक सोहळा, दुपारी ४ ते ६ वाजता होळकर घर ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत मोटरसायकल रॅली व ढोलताशा पथक, सायंकाळी ६ ते ७ वाजता लेझीम नृत्य, वेशभूषा व वक्तृत्व स्पर्धा, सायंकाळी ७ते ८ वाजता स्नेहभोजन व खेळ पैठणीचा, संगीत खुर्ची खेळ, रात्री ८ ते ९ वाजता मर्दानी खेळ, बक्षीस समारंभ कार्यक्रम होणार आहेत.
वेशभूषा व वक्तृत्व स्पर्धेत भाग घेण्यासाठी पांडुरंग राऊळ- ९९६७३३३१०० यांच्याशी संपर्क साधावा. ग्रामस्थ, शिवप्रेमींनी कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन भिल्लवाडी ग्रुप, अध्यक्ष तथा समाजसेवक पांडुरंग राऊळ, ग्रामविकास मंडळ, मुंबई व मळगाव ग्रामस्थांनी केले आहे.

