*कोंकण एक्सप्रेस*
*सोनाळी येथे मोफत आरोग्य शिबीर संपन्न*
*४० रुग्णांनी घेतला लाभ*
*वैभववाडी : प्रतिनिधी*
वैभववाडी तालुक्यातील श्री राजन पाटील आयुर्वेदिक हॉस्पिटल आणि रिसर्च इन्स्टिट्यूट सांगळवाडी या आयुर्वेदिक हॉस्पिटल च्या माध्यमातून सोनाळी ग्रामपंचायत येथे ग्राम पंचायती च्या सहकार्यातुन मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आने होते. या शिबीरात गावातील 40 रुग्णांनी लाभ घेतला. यामध्ये मधुमेह, रक्तदाब, स्त्रियांचे आजार, संधीवात, गुडघ्याचे आजार, आम्लपीत, अल्सर, त्वचारोग आदी आजारावर उपचार करण्यात आले.
तर सांगुळवाडी येथे सुरु असलेल्या श्री राजन पटिल आयुर्वेदिक हॉस्पिटल येथे सर्व प्रकारच्या आजारावरती मोफत तपासणी उपचार सुरु आहेत याचा तालुक्यातील ग्रामस्थांनी लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे संचालक संदीप पाटील व सचिव सुधाकर येवले यांनी केले आहे.