*कोंकण एक्सप्रेस*
*आमदार निलेश राणे यांच्या इशाऱ्याचा तात्काळ इफेक्ट*
*प्रशासनाने “ती” टपरी केली उध्वस्त*
*खानांची दहशत या जिल्ह्यात चालू देणार नाही ; आमदार निलेश राणे*
*सिंधुदुर्ग : प्रतिनिधी*
मुंबई गोवा हायवे वरील कुडाळ तालुक्यातील झाराप तिठ्यावरील “त्या” टपरी चालकाबाबत आमदार निलेश राणे यांनी इशारा देताच प्रशासनाने ती चहाची टपरी जमीनदोस्त केली आहे.त्यामुळे निलेश राणे यांनी प्रशासनाचे आभार मानले असून मात्र नियोजित तारखेला व आपण सकल हिंदू समाजाच्या वतीने त्या ठिकाणी पोहचून तेथील ग्रामस्थांना धीर देऊन त्यांच्याशी संवाद साधणार असल्याचे म्हटले आहे.
मुंबई गोवा हायवे वरील कुडाळ तालुक्यातील झाराप तीठ्यावर चार दिवसापूर्वी एका चहाच्या टपरीवर खान नमक व्यक्तीने व त्याच्या सग्या सोयऱ्यांनी पर्यटकांना बेदम मारहाण करून कपडे फाडून रस्त्यावर दोरीने बांधून ठेवले होते या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल झाला होता.याची गंभीर दखल कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी घेऊन ४८ तासात पोलीस प्रशासनाने व महसूल प्रशासनाने ती अनधिकृत टपरी उध्वस्त केले नाही तर आपण १२ तारीख ला ती टपरी उध्वस्त करणार असा इशारा देताच अवघ्या काही तासातच सदरची टपरी प्रशासनाकडून उध्वस्त करण्यात आली आहे.

