जिल्हास्तरीय हॅकेथॉन स्पर्धेत केंद्रशाळा मठ नं १ शाळेचा प्रथम क्रमांक : राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

जिल्हास्तरीय हॅकेथॉन स्पर्धेत केंद्रशाळा मठ नं १ शाळेचा प्रथम क्रमांक : राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

*कोंकण एक्सप्रेस*

*जिल्हास्तरीय हॅकेथॉन स्पर्धेत केंद्रशाळा मठ नं १ शाळेचा प्रथम क्रमांक : राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड*

*वेंगुर्ला : प्रतिनिधी*

स्टार्स प्रकल्पांतर्गत इयत्ता ६ वी ते ८ वी च्या वि‌द्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय हॅकेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत प्राथमिक गटातून कै रायसाहेब डॉ. रामजी धोंडजी खानोलकर केंद्रशाळा मठ नं १ शाळेने प्रथम क्रमांक पटकावला असून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शाळेची निवड झाली आहे.

स्टार्स प्रकल्पांतर्गत इयत्ता ६ वी ते ८ वी च्या वि‌द्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय हॅकेथॉन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचा मुख्य उद्देश वि‌द्यार्थ्यांमध्ये नवनिर्मितीची मानसिकता विकसित करणे तसेच २१ व्या शतकातील आवश्यक कौशल्यांची रुजवणूक करणे हा आहे. यामध्ये वि‌द्यार्थ्यांना उ‌द्योजकतेबाबत जागरुकता निर्माण करून स्थानिक ते जागतिक स्तरावरील समस्या सोडवण्यासाठी प्रतिकृती तयार करणे अपेक्षित होते.राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय व खाजगी अनुदानित शाळांमधील इयत्ता ६ वी ते ८ वीच्या वि‌द्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवलेला होता. सहभाग नोंदणीसाठी जिल्हास्तरीय लिंक उपलब्ध करून देण्यात आली होती.

जिल्हास्तरीय हॅकेथॉन स्पर्धेसाठी प्राथमिक स्तरासाठी ५० प्रतिकृतींची निवड कारण्यात आलेली होती. न्यू इंग्लिश स्कूल कसाल येथे सदर हॅकेथॉनचे आयोजन करण्यात आलेले होते. कै रायसाहेब डॉ. रामजी धोंडजी खानोलकर केंद्रशाळा मठ नं १ ने या हॅकेथॉन साठी सौर ट्रॅकर ही प्रतिकृती सादर केलेली होती. याचे सादरीकरण काशिनाथ संतोष तेंडोलकर व सुयश संतोष नांदोस्कर या विद्यार्थ्यांनी केले. यांना शाळेचे केंद्रमुख्याध्यापक अजित तांबे, पांडुरंग चिंदरकर, प्रतिमा साटेलकर, गणेश नाईक यांनी मार्गदर्शन केले.यशस्वी विद्यार्थी यांचे शाळा व्यवस्थापन समिती, इतर सर्व समित्या आणि गावातील ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!