*कोंकण एक्सप्रेस*
*पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार शासकीय ध्वजारोहण*
*सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी*
प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.हा शासकीय कार्यक्रम रविवार दिनांक २६ जानेवारी रोजी सकाळी ९.१५ वाजता पोलीस परेड ग्राऊंड, सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे होणार आहे. ध्वजारोहण कार्यक्रमानंतर ९.३० ते ९.४० दरम्यान पोलीस व राखीव पोलीस दल यांचे संचलन होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

