*कोंकण एक्सप्रेस*
*हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृति कल्पवृक्ष स्मारकाची पुनर्बाधणी २३ जानेवारीला – बबन साळगावकर*
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृति कल्पवृक्ष स्मारकाची पुनर्बाधणी गुरुवार दिनांक २३ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता पाळणे कोंड धरण येथे होणार आहे.यावेळी नवीन चांगली पाच नारळाची रोप आणली आहेत.आठ वर्षापूर्वी हे कल्पवृक्ष स्मारक उभारण्यात आले होते,परंतु सावंतवाडी नगरपरिषेचा नवीन फिल्टरेशन प्लांट या जागेवरती बसवत असल्याने हे स्मारक बाधित होत आहे.
याविषयी तीन बैठका सावंतवाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री.सागर साळुंखे,पाणीपुरवठा पर्यवेक्षक संतोष भिसे यांच्या सोबत झाल्या.या बैठकांमध्ये प्रत्यक्ष जागेवरती जाऊन योग्य अशी जागा निवडण्यात आली आहे. या वेळी माजी नगरसेवक विलास जाधव,सिताराम गावडे,माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर हे उपस्थित होते.यावेळी हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी गुरुवार दिनांक २३ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता नवीन स्मारकाची पुनर्बाधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तरी या नवीन स्मारकाच्या कल्पवृक्ष रोपणा प्रसंगी तमाम बाळासाहेब ठाकरे प्रेमींनी पाळणे कोंड धरण येथे उपस्थित रहावे असे आवाहन माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केले आहे.

