शिकारीस विना परवाना बंदुक वापरुन एकास गंभीर दुखापतीस कारणीभुत ठरलेल्या दोघांना जामीन मंजुर

शिकारीस विना परवाना बंदुक वापरुन एकास गंभीर दुखापतीस कारणीभुत ठरलेल्या दोघांना जामीन मंजुर

*कोंकण एक्सप्रेस*

*शिकारीस विना परवाना बंदुक वापरुन एकास गंभीर दुखापतीस कारणीभुत ठरलेल्या दोघांना जामीन मंजुर*

*सावंतवाडी :प्रतिनिधी*

पारपोली येथील लिंगाचा वायंगणी येथील जंगलात शिकारीसाठी गेलेल्या तीन युवकांपैकी एका युवकाकडून अनावधानाने गोळीबार होऊन अन्य युवक गंभीर जखमी झाला व त्यास बांबोळी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यापैकी आरोपी क्र. १ वेदांत लक्ष्मण गुरव यास मे. कोर्टाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दिलेली होती. तसेच आरोपी क्र. २ रविंद्र वसंत गुरव यांस दोन दिवसांची पोलिस कोठडी मे. कोर्टाने दिलेली होती तरी, सदर प्रकरणात आज सावंतवाडी कोर्टात दोघांना हजर करण्यात आले. आरोपी यांच्या वकीलांचा युक्तीवाद न्यायालयाने ऐकुन घेऊन दोघांना मे. कोर्टाने न्यायालयाने जामीन मंजुर केला आहे.

याप्रकरणी आरोपी पक्षाकडुन अॅड. अनिल कृष्णा निरवडेकर, अॅड. गणेश प्रकाश चव्हाण, अॅड अशोक गंगाराम जाधव, अॅड. प्रितेश लक्ष्मण गवस, अॅड. दत्तप्रसाद ठाकुर व अॅड. केतन नारायण जाधव यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!