*कोंकण एक्सप्रेस*
*महाराष्ट्र राज्याचे माजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दत्ताजी राणे यांचे दुःखद निधन*
*कणकवली : प्रतिनिधी*
महाराष्ट्र राज्याचे माजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि कणकवली/ जानवली गावचे सुपुत्र दत्ताजी राणे यांचे बुधवारी पहाटे मुंबईत दुःखद निधन झाले.1995 मधील शिवसेना-भाजपा युतीच्या काळात दत्ताजी राणे हे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री होते.
दत्ताजींच्या निधनाबद्दल गुरुवार दिनांक 19 जानेवारी रोजी विशेष शोकसभा सकाळी 11 वाजता ग्रामपंचायत कार्यालय जानवली येथे आयोजित करण्यात आल्याचे जानवली चे सरपंच अजित पवार यांनी सांगितले.या शोकसभेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही जानवली सरपंच अजित पवार यांनी केले आहे.
भारतीय जनता पार्टी मुंबईचे सरचिटणीस सुनील राणे यांचे दत्ताजी राणे हे वडील होत.दत्ताजींच्या जाण्यानं जानवली या त्यांच्या जन्म गावीही शोक व्यक्त होत आहे.

