विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत अल्पसंख्याक दिन उत्साहात साजरा

विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत अल्पसंख्याक दिन उत्साहात साजरा

*कोंकण एक्सप्रेस*

*विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत अल्पसंख्याक दिन उत्साहात साजरा*

*कणकवली : प्रतिनिधी*

विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत अल्पसंख्याक दिन साजरा करण्यात आला प्रशालेत विविध राज्यातील १०० विद्यार्थी धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.या सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रशालेत अमराठी भाषिकांचे मार्गदर्शन वर्गही घेतले जातात.मराठी राज्यभाषा ही महाराष्ट्राची ज्ञान भाषा आहे.त्यामुळे अल्पसंख्याक विद्यार्थांना त्यांची जन्मभाषा आणि मराठी भाषा यांचे शिक्षण देवून ज्ञानभाषेच्या प्रवाहात आणून सोडण्याचे महत्वाचे काम विद्यामंदिर प्रशालेने केले आहे.अल्पसंख्याक दिन साजरा करण्या मागचा उद्देश आणि भारतीय संविधानाची तरतूद या विषयी मार्गदर्शन श्री वणवे सरांनी केले.

प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पी जे कांबळे सरांनी अल्पसंख्याक आणि शिष्यवृती योजना यांचे मार्गदर्शन करून समतेची शिकवण प्रशालेत कशाप्रकारे दिली जाते याचे महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.श्री संदिप कदम सरांनी समतेतून एकात्मता याचे दर्शन घडवून आणले. पर्यवेक्षक सौ वृषाली जाधव मॅडम यांनी शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाला श्री खरात सर श्री ठाकूर सर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री दरडा सरांनी केले आभार श्री वणवे सरांनी मानले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!