*कोंकण Express*
*वेंगुर्ला हायस्कूल येथे १० व ११ डिसेंबरला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन*
*वेंगुर्ला : प्रतिनिधी*
जिल्हापरिषद सिधुदुर्ग व पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने ५२ वे वेंगुर्ला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन १० व ११ डिसेंबर या कालावधीत वेंगुर्ला हायस्कूल येथे आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार दिपक केसरकर यांच्या हस्ते १० डिसेंबरला दुपारी २ वाजता होणार आहे.
उद्घाटनप्रसंगी गटविकास अधिकारी दिनेश पाटकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. गणपती कमळकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिपी, मुख्याधिकारी परितोष कंकाळ, शिक्षणाधिकारी निलिमा नाईक, कोल्हापूर चर्च कौन्सिलचे सेक्रेटरी दिनानाथ कदम, चेअरमन डी.डी. धनवडे आदी उपस्थित रहाणार आहेत. १० डिसेंबरला सकाळी १० वा. विज्ञान प्रदर्शन प्रतिकृती सहभाग नोंदणी, प्रदर्शन साहित्य मांडणी, लहान व मोठ्या गटात निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा, लहान गटात प्रश्नमंजूषा तसेच ११ डिसेंबरला सकाळी १० वा. मोठ्या गटात प्रश्न मंजूषा स्पर्धा आणि प्रतिकृती परिक्षण, दुपारी २ वा. गटविकास अधिकारी दिनेश पाटकर यांच्या अध्यक्षतेखाली पारितोषिक वितरण व समारोप होणार आहे.
तरी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी आणि वेंगुर्ला हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रमोद कांबळे यांनी विस्तार अधिकारी, सर्व केंद्रप्रमुख, सर्व मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, तालुका शिक्षक संघटनेचे सर्व प्रतिनिधी, वेंगुर्ला हायस्कूल आणि पंचायत समिती शिक्षण विभाग कर्मचारी यांच्या वतीने केले आहे.