पुणे, पिंपरी आणि जिल्हा मिळून पाच दिवसात २६,७०९ नवे रुग्ण

पुणे शहर, पिंपरी आणि जिल्ह्य़ात पाच सप्टेंबर ते दहा सप्टेंबर या अवघ्या पाच दिवसांच्या कालावधीत  तब्बल २६,७०९ नवीन करोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्य़ातील एकू ण रुग्णसंख्या गुरुवारी २,११,२२५ पर्यंत जाऊन पोहोचली आहे. या पाच दिवसांमध्ये दररोज पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच उर्वरित जिल्ह्य़ात मिळून चार हजाराहून अधिक रुग्ण आढळले असून जिल्ह्य़ात एकाच दिवसात नोंदवली गेलेली ही सर्वाधिक रुग्णवाढ आहे.

पाच सप्टेंबरला पुणे जिल्ह्य़ातील दिवसभरातील रुग्णसंख्येने चार हजारांचा टप्पा ओलांडत ४०५० पर्यंत वाढ नोंदवली. त्यानंतर सलग पाच दिवसात जिल्ह्य़ातील रुग्णसंख्या चार हजारांच्या वर जात असल्याचे चित्र आहे. पुणे, पिंपरी महापालिका क्षेत्रांबरोबरच ग्रामीण भागांतील वेगाने होणारा करोनाचा फै लाव ही यातील मुख्य चिंतेची बाब ठरत आहे. या पाच दिवसांमध्ये ११,७५६ नवे रुग्ण पुणे शहरात आढळले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका भागात ६६७७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. उर्वरित जिल्ह्य़ातील रुग्णवाढ ८२७६ एवढी आहे. त्यामुळे सुरुवातीला के वळ शहरांपुरताच मर्यादित असलेला करोनाचा संसर्ग ग्रामीण भागात फैलावण्यास सुरुवात झाल्यामुळे त्याला रोखण्याचे मोठेच आव्हान आरोग्य यंत्रणांसमोर उभे राहिले आहे. या पाच दिवसांच्या कालावधीत जिल्ह्य़ात ४६५ रुग्ण करोनाने दगावले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!