*कोंकण Express*
*महायुतीच्या संभाव्य मंत्र्यांची यादी, कोणाला संधी कोणाचा पत्ता कट ?*
*मुंबई : प्रतिनिधी*
राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीने घसघशीत यश प्राप्त केली. त्यानंतर आता २ डिसेंबरला मुख्यमंत्रिपदासाठी शपथविधी सोहळा पार पडणार असल्याची माहिती आहे. त्यापूर्वी आता महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळणार आणि कोणाचा पत्ता कट होणार याबाबत चर्चा रंगली आहे. एपीबीने दिलेल्या वृत्तानुसार, मंत्रिमंडळात भाजपला सर्वाधिक २० ते २५ मंत्रिपदं, तर शिंदेंच्या शिवसेनेला १०-१२ तर, अजित पवार गटाला ७-९ मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे.सध्या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळाली आहे, त्याची संभाव्य मंत्र्यांची यादी समोर आली आहे.
भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी – देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री),गिरीश महाजन,रविंद्र चव्हाण,मंगलप्रभात लोढा,चंद्रशेखर बावनकुळे,आशिष शेलार,नितेश राणे,शिवेंद्रसिंहराजे भोसले,राहुल कुल,माधुरी मिसाळ,संजय कुटे,राधाकृष्ण विखे पाटील,गणेश नाईक,पंकजा मुंडे,गोपीचंद पडळकर
कोणाचा पत्ता कट होणार ? – विजयकुमार गावित,सुधीर मुनगंटीवार शिवसेना शिंदे गटाची संभाव्य मंत्र्यांची यादी – उदय सामंत,शंभूराज देसाई,गुलाबराव पाटील,संजय शिरसाट,भरत गोगावले,प्रकाश सुर्वे,प्रताप सरनाईक,तानाजी सावंत,राजेश क्षीरसागर,आशिष जैस्वाल,निलेश राणे
या नेत्यांचा हिरमोड होणार ?- दीपक केसरकर,अब्दुल सत्तार,संजय राठोड
राष्ट्रवादी संभाव्य मंत्र्यांची यादी – अजित पवार,धनंजय मुंडे,छगन भुजबळ,अदिती तटकरे,अनिल पाटील,हसन मुश्रीफ ,धर्मराव बाबा अत्राम.