निगुडेतील ओपन जिम स्थापितीचे काम चुकीचे

निगुडेतील ओपन जिम स्थापितीचे काम चुकीचे

*कोंकण Express*

*निगुडेतील ओपन जिम स्थापितीचे काम चुकीचे*

*अखेर जिम साहित्य हटवले : गुरुदास गवंडे यांच्या प्रयत्नांना यश*

*सावंतवाडी : प्रतिनिधी*

*निगुडे मागासवर्गीय वस्ती मधील ओपन जिम स्थापित करणे काम चुकीचे झाले होते त्यामुळे अखेर सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग सिंधुदुर्ग यांनी सदर ओपन जिम निगुडे इथून अखेर हटवली माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांच्या प्रयत्नांना यश*

बांदा प्रतिनिधी: निगुडे ग्रामपंचायतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय विभाग सिंधुदुर्ग यांच्याकडे मागासवर्गीय वस्तीत ओपन जिमची मागणी केली होती. व प्रस्ताव सादर केला होता. तत्कालीन शिक्षण मंत्री श्री दीपक केसरकर यांच्या निधीतून मागासवर्गीय वस्तीत ओपन जिम स्थापन करण्याकरता दहा लाख रुपये ची निधी मंजूर झाली होती परंतु निगुडे सरपंच श्री. लक्ष्मण निगुडकर यांनी मासिक सभेचा ठराव डावलून सदर ओपन जिम चुकीच्या पद्धतीने ग्रामपंचायत निगुडे कार्यालयाच्या आवारामध्ये बसवली होती परंतु जमीन मालकांनी विरोध केल्यानंतर सदर जिम सरपंच यांनी काढून बाजूला ठेवली होती व ती पावसाळ्यात सडून गंजून गेली होती या विरोधात 3 सप्टेंबर च्या तहकुब ग्रामसभेमध्ये माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी कागदपत्रासहित पुराव्यानिशी सरपंच निगुडे यांना धारेवर धरलं होतं व हा विषय ग्रामसभेमध्ये चर्चेचा ठरला व यासंदर्भात गटविकास अधिकारी तथा प्रशासक पंचायत समिती सावंतवाडी श्री. वासुदेव नाईक यांना या संदर्भात चौकशी करण्यासाठी गुरुदास गवंडे यांनी पत्रव्यवहार केला होता. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग सिंधुदुर्ग यांनी त्याची दखल घेऊन अखेर आज निगुडे ग्रामपंचायतच्या मागासवर्गीय वस्तीतील ओपन जिम साहित्य प्रशासनाने जमा केले जर निगुडे सरपंच, उपसरपंच स्वतःच्याच मागासवर्गीय वस्तीमध्येच जर शासनाचा निधी खर्च करू शकत नाही त्याचे योग्य नियोजन करू शकत नाही तर ते गावचा विकास काय करणार त्यामुळे त्यांनी या सर्व गोष्टीची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी माजी उपसरपंच गुरूदास गवंडे यांनी केली आहे.

निगुडे ग्रामपंचायतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय विभाग सिंधुदुर्ग यांच्याकडे मागासवर्गीय वस्तीत ओपन जिमची मागणी केली होती. व प्रस्ताव सादर केला होता. तत्कालीन शिक्षण मंत्री श्री दीपक केसरकर यांच्या निधीतून मागासवर्गीय वस्तीत ओपन जिम स्थापन करण्याकरता दहा लाख रुपये ची निधी मंजूर झाली होती परंतु निगुडे सरपंच श्री. लक्ष्मण निगुडकर यांनी मासिक सभेचा ठराव डावलून सदर ओपन जिम चुकीच्या पद्धतीने ग्रामपंचायत निगुडे कार्यालयाच्या आवारामध्ये बसवली होती परंतु जमीन मालकांनी विरोध केल्यानंतर सदर जिम सरपंच यांनी काढून बाजूला ठेवली होती व ती पावसाळ्यात सडून गंजून गेली होती.या विरोधात 3 सप्टेंबर च्या तहकुब ग्रामसभेमध्ये माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी कागदपत्रासहित पुराव्यानिशी सरपंच निगुडे यांना धारेवर धरलं होतं व हा विषय ग्रामसभेमध्ये चर्चेचा ठरला व यासंदर्भात गटविकास अधिकारी तथा प्रशासक पंचायत समिती सावंतवाडी श्री. वासुदेव नाईक यांना या संदर्भात चौकशी करण्यासाठी गुरुदास गवंडे यांनी पत्रव्यवहार केला होता.

सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग सिंधुदुर्ग यांनी त्याची दखल घेऊन अखेर आज निगुडे ग्रामपंचायतच्या मागासवर्गीय वस्तीतील ओपन जिम साहित्य प्रशासनाने जमा केले जर निगुडे सरपंच, उपसरपंच स्वतःच्याच मागासवर्गीय वस्तीमध्येच जर शासनाचा निधी खर्च करू शकत नाही त्याचे योग्य नियोजन करू शकत नाही तर ते गावचा विकास काय करणार त्यामुळे त्यांनी या सर्व गोष्टीची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी माजी उपसरपंच गुरूदास गवंडे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!