मतमोजणीसाठी कर्मचाऱ्यांचे कुडाळ येथे झाले प्रशिक्षण

मतमोजणीसाठी कर्मचाऱ्यांचे कुडाळ येथे झाले प्रशिक्षण

*कोंकण Express*

*मतमोजणीसाठी कर्मचाऱ्यांचे कुडाळ येथे झाले प्रशिक्षण*

*कुडाळ ः प्रतिनिधी*

कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाच्या झालेल्या निवडणुकीची मतमोजणी उद्या शनिवार २३ नोव्हेंबर रोजी तहसीलदार येथे होणार आहे या संदर्भात मतमोजणीसाठी असलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुसे यांनी घेतले.

कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाची निवडणूक झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष निकालाकडे लागून राहिले आहे या निकाल प्रक्रियेमध्ये प्रशासनही सज्ज झाले आहे सर्व प्रकारची खबरदारी प्रशासन घेत आहे असे असताना मतमोजणी कशाप्रकारे केली जाणार आणि या मतमोजणी मध्ये कोणत्या समस्या आल्यावर कशा सोडवल्या जाव्यात या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुसे यांनी सर्व मतमोजणीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण कुडाळ येथे घेतले यावेळी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!