विलास पवार यांच्या उमेदवारीने देवळालीकरांत आनंदाची लहर

विलास पवार यांच्या उमेदवारीने देवळालीकरांत आनंदाची लहर

*कोंकण Express*

*विलास पवार यांच्या उमेदवारीने देवळालीकरांत आनंदाची लहर*

नाशिक शहरातील तीन विधानसभा मतदार संघाला लागूनच तालुक्यातील ग्रामीण भागाचा समावेश असलेला देवळाली विधानसभा मतदार संघ आहे. मतदार संघाचे नाव देवळाली असले तरी ज्या देवळाली कॅम्प वरून मतदार संघास नाव मिळाले तेथील एकही स्थानिक आमदार झालेला नाही. अशातच देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष विलास पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार) पक्षाकडून उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार ठरत आहेत. त्यामुळे देवळालीच्या मातीत लहानाचा मोठा होऊन कर्तुत्व गाजवलेला स्थानिक आमदार लाभणार असल्याने देवळालीकर समाधान व्यक्त करीत आहेत.
देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष असताना विलास पवार यांच्या विकास कामाचा धडाका देवळाली करांनी अनुभवलेला आहे. त्याच धर्तीवर ते संपूर्ण देवळाली विधानसभा मतदार संघातील विकासाचा रखडलेला प्रश्न मार्गी लावून देवळाली कॅम्पसारखा संपूर्ण मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलतील अशी भावना मतदार व्यक्त करताना दिसून येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!