*कोंकण Express*
*सांवतवाडीतील केसरी येथे स्वाद केसरी हॉटेलचे आज १५ जुलै रोजी उद्घाटन*
*मुंबई*
कोकणातील खाद्य संस्कृती जपणारं, शाकाहारी- मांसाहारी पदार्थांची रेलचेल असलेलं सर्व खवय्यांना मायेची चव देणारे स्वाद केसरी…चव मायेची या हॉटेलचे भव्य उदघाटन आज १५ जुलै २०२४ रोजी सौ. सुहासी रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते सावंतवाडी येथे होणार आहे.
सावंतवाडी तालुक्यातील केसरी येथे केएसआर ग्लोबल अँक्वेरियम येथे सुरु करण्यात येणारे स्वाद केसरी हॉटेलचे उद्घाटन सोमवार , १५ जुलै रोजी सकाळी ९ वाजता होणार आहे. उत्कृष्ट चव, उत्तम दर्जा व शाकाहारी-मांसाहारी पदार्थांचे नवीन ठिकाण आता खवय्यांसाठी तसेच कोकणातील पर्यटकांसाठी उपलब्ध होणार आहे. या भव्य उदघाटनप्रसंगी सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन निमंत्रक केएसआर ग्लोबल अँक्वेरियम परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे.