*विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत जागतिक योग दिन उत्साहात साजरा* 

*विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत जागतिक योग दिन उत्साहात साजरा* 

*कोंकण Express*

*विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत जागतिक योग दिन उत्साहात साजरा* 

*कणकवली ः प्रतिनिधी*

विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत जागतिक योग दिनाचे औचित्य साधून प्रशालेतील सर्व विद्यार्थ्याना योगविद्या आणि आरोग्य या विषयी मार्गदर्शन करण्यात आले यावेळी विद्यामंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल विद्या मंदिर प्राथमिक विभाग हे सर्व विद्यार्थी योग प्रात्यक्षिक करण्यात दंग झालेलेली होती योग शिक्षण बालपणापासून आत्मसाथ केले तर मानवी आरोग्य उत्तम राहाते म्हणून तिन्ही संकुलात योग विद्यामध्ये प्रविण असलेले प्रशिक्षक मार्गदर्शन करत होते प्रशालेतील सर्व शिक्षक विद्यार्थ्या समवेत योग प्रात्यक्षिके स्वतः करत होते व मार्गदर्शन ही करत होते आज २१ जून योग प्रात्यक्षिकांने सर्व शाळा परिसर बहरून गेला होता . पावसाचे वातावरण असूनही शाळेच्या परिसरात योग प्रात्यक्षिक जिथे जागा मिळेल तिथे तिथे सर्व विद्यार्थी व शिक्षक योग विद्येचे महत्व सर्व समाजापर्यंत पोहचवित होते यावेळी प्रशालेतील योग शिक्षक व क्रीडा शिक्षक यांनी खूप परिश्रम घेवून योगा शिक्षणाचे प्रात्यक्षिक सर्वांना दिलेले होते . निटनेटके नियोजन सुंदर सादरीकरण आणि प्रशालेच्या प्रशस्थ क्रीडांगणात परिसरात योग विद्या आज फुलून आली होती क्रीडा शिक्षक श्री अच्यूतराव वणवे सर ‘ श्री सुदिन पेडणेकर सर श्री आनंदा सुतार सर योग शिक्षिका सौ विद्या शिरसाट मॅडम सौ शर्मिला केळूसकर मॅडम सौ दीपाली नौकुडकर मॅडम यांनी प्रशालेतील सर्व विद्यार्थांना योग प्रात्यक्षिकाचे मार्गदर्शन केले मुख्याध्यापक श्री पिराजी कांबळे सरांनी योग दिनाचे महत्व विषद करून शुभेच्छा दिल्या पर्यवेक्षिका सौ वृषाली जाधव इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ राणे मॅडम प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ करंबळेकर मॅडम व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा दतात्रय तवटे साहेब चेअरमन डॉ .सौ . साळुंखे मॅडम सचिव विजयकुमार वळंजू साहेब यांनी योग दिनाच्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!