माध्यमिक विद्यामंदिर कनेडी हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

माध्यमिक विद्यामंदिर कनेडी हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

*कोंकण Express*

*माध्यमिक विद्यामंदिर कनेडी हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री. मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड काॅमर्स कनेडी, श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ सायन्स कनेडी आणि बालमंदिर कनेडी येथे वार- शुक्रवार, दिनांक-२१ जून २०२४ रोजी, प्रशालेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.*

*प्राचीन काळापासून भारताला योग विद्येचा समृद्ध वारसा मिळाला आहे.योगा हे जणू भारताला मिळालेले मोठे वरदान आहे.भारताने जगाला योगाची ओळख करून दिली आणि जगभरात योगाचा प्रसार केला.जगभरातील लोकांना योगाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि योगाप्रती लोकांना जागृत करण्यासाठी दरवर्षी २१ जून हा दिवस जगभरात “आंतरराष्ट्रीय योग दिन ” म्हणून साजरा केला जातो.*

*दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिनाची एक विशिष्ट थीम ठरवली जाते. ही थीम घेऊन योग दिनाचे आयोजन केले जाते.या वर्षीच्या२०२४ ची आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम ही ” स्वतःसाठी आणि समाजासाठी योग “(Yoga for self and Socity) अशी आहे.*

*प्रशालेमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन क्रीडा विभागामार्फत करण्यात आले, क्रीडा विभाग प्रमुख व क्रीडा शिक्षक मा.श्री.बयाजी बुराण सर यांनी विद्यार्थ्यांना योग दिनाचे महत्त्व पटवून दिले.मुळात म्हणजे योगा कोणत्या एका दिवसासाठी नव्हे तर दररोज करणे महत्त्वाचे आहे.योगा केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. या दिवसाचा उद्देश अध्यात्मिक आणि शारीरिक साधनेच्या फायद्यांबद्दल जागरूकता पसरवणे असा आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी दररोज योगा करणे आवश्यक आहे.*

*या योग दिनासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थितीत होते*.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!