प्रथितयश उद्योजक व झाटये काजु चे मालक सुधिर झाटये यांचा भाजपा मध्ये प्रवेश

प्रथितयश उद्योजक व झाटये काजु चे मालक सुधिर झाटये यांचा भाजपा मध्ये प्रवेश

*कोंकण Express*

*प्रथितयश उद्योजक व झाटये काजु चे मालक सुधिर झाटये यांचा भाजपा मध्ये प्रवेश*

*पालकमंत्री रविंद्रजी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा प्रवेश*

*सुधीर झाटये यांची भाजपा जिल्हा उद्योग आघाडी संयोजक पदी निवड*

कुडाळ येथील महालक्ष्मी हॉलमध्ये पालकमंत्री श्री. रविन्द्रजी चव्हाण यांच्या उपस्थितीत तुळस – वेंगुर्ला येथील प्रसिध्द काजूउद्योजक श्री. सुधीर झांटये यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला . पालकमंत्री रविंद्रजी चव्हाण व जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी त्यांना भाजपा जिल्हा उद्योग आघाडी संयोजक पदी नियुक्त केले . तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त उद्योजक भाजपा मध्ये सामील करून घ्यावेत असे आवाहन केले . तसेच उद्योग आघाडीच्या वतीने रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार नारायणराव राणे साहेबांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे , असे आवाहन केले .
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष श्री. सुहास गवंडळकर, वेंगुर्ला महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सौ. सुजाताताई पडवळ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!