शालेय ग्रंथालय समृद्धीचा खरा आधार: सुनील नाईक

शालेय ग्रंथालय समृद्धीचा खरा आधार: सुनील नाईक

*कोंकण Express*

*शालेय ग्रंथालय समृद्धीचा खरा आधार: सुनील नाईक*

शालेय ग्रंथालय समृद्धीचा खरा आधार असून ते आपल्याला वैचारिक संपन्नतेकडे घेऊन जातात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय संयुक्त कट्टा प्रशालेच्या पुस्तक प्रदर्शन उद्घाटन प्रसंगी सचिव श्री सुनील नाईक यांनी असे उद्गार काढले
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रशालेतील इयत्ता आठवीचे पालक संस्था पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडले यावेळी शालेय ग्रंथालयातील कथा कादंबरी बाल साहित्य, किशोर साहित्य, विश्वकोश, संदर्भ ग्रंथ, यांचे प्रदर्शन गुरुदक्षिणा सभागृहात मांडण्यात आले होते. या प्रदर्शनाचा लाभ प्रशालेतील 1000 विद्यार्थ्यांनी घेतला. या कार्यक्रमाप्रसंगी प्रशाळेचे मुख्याध्यापक श्री संजय नाईक, क.पं. शि.प्र.मंडळ सचिव श्रीमती देसाई मॅडम स्कूल कमिटी अध्यक्ष श्री सुधीर वराडकर,संचालिका सौ. स्वाती वराडकर मॅडम, पालक, ग्रामस्थ, हितचिंतक, प्रशालेतील शिक्षक- शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार ग्रंथपाल सुकाळे मॅडम यांनी मांडले तर या कार्यक्रम प्रसंगी कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री अजय राज, वराडकर, विश्वस्त एडवोकेट एस एस पवार, कर्नल शिवानंद वराडकर यांनी भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!