पिंगुळी येथे कुडाळेश्वर ज्ञातीबांधवांचे लवकरच भवन उभारले जाणार

पिंगुळी येथे कुडाळेश्वर ज्ञातीबांधवांचे लवकरच भवन उभारले जाणार

*कोंकण Express*

*पिंगुळी येथे कुडाळेश्वर ज्ञातीबांधवांचे लवकरच भवन उभारले जाणार ; रणजित देसाई*

*कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण प्रतिष्ठानच्या महोत्सवाला उत्फुर्त प्रतिसाद…*

*कुडाळ ः प्रतिनिधी*

गेली अनेक वर्षे प्रतिक्षेत असलेल्या कुडाळेश्वर ज्ञातीबांधवाच्या भवनाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. तालुक्यात पिंगुळी येथे हे भवन उभारण्यात येणार आहे, अशी माहिती कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष रणजित देसाई यांनी दिली. प्रतिष्ठानच्या माध्यमातून कुडाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी डॉ. उमाकांत सामंत, गौड ब्राह्मण सभा गिरगावचे अध्यक्ष जगदीश बालावलकर, मेंगलोर संस्थेचे प्रमुख शिवानंद प्रभू, ज्येष्ठ पत्रकार संजीवनी देसाई, कणकवली मंडळाचे अध्यक्ष सुरेश सामंत, बेळगाव मंडळाचे प्रमुख श्रीकांत आजगावकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष रणजीत देसाई, सचिव प्रशांत धोंड, अमृता गाळवणकर प्रसन्न प्रभूतेंडुलकर, ऋषिकेश देसाई, प्रफुल्ल वालावलकर, डॉ. तेजस्विनी देसाई, मधुरा खानोलकर, ज्योती देसाई, सलोनी खानोलकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!