युवासेनेच्या निर्धार मताधिकक्याचा ..गावदौरा सुसंवादाचा कार्यक्रमाला कुणकेश्वर विभागातून शुभारंभ

युवासेनेच्या निर्धार मताधिकक्याचा ..गावदौरा सुसंवादाचा कार्यक्रमाला कुणकेश्वर विभागातून शुभारंभ

*कोकण Express*

*युवासेनेच्या निर्धार मताधिकक्याचा ..गावदौरा सुसंवादाचा कार्यक्रमाला कुणकेश्वर विभागातून शुभारंभ*

*तांबळडेग, हिंदळे, खुडी-मुणगे,पोयरे गावात बैठका संपन्न*

*देवगड ः प्रतिनिधी*

खा. विनायक राऊत यांच्या महत्वाच्या विकासकामांची प्रसिद्धीपत्रकातून माहिती जनतेपर्यंत पोचवण्यासाठी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उबाठा आणि युवासेनेच्या शिलेदारांनी कंबर कसली असून निर्धार मताधिकक्याचा ..गावदौरा सुसंवादाचा या उपक्रमाचा शुभारंभ देवगड तालुक्यातील कुणकेश्वर जिल्हा परिषद मतदारसंघातून करण्यात आला. कुणकेश्वर विभागातील
तांबळडेग, हिंदळे, खुडी-मुणगे,पोयरे गावात ग्रामस्थांच्या गाठीभेटी घेत त्यांना खासदार विनायक राऊत यांनी केलेल्या विकासकामांचे प्रसिद्धीपत्रक देण्यात आले. या उपक्रमातून थेट गावागावात आणि घराघरात शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केलेल्या विकासकामांची माहिती युवासेना पोचवत आहे. सुसंवाद गावदौरा अभियानाला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी देवगड तालुकाप्रमुख मिलींद साटम , युवासेना तालुकाप्रमुख गणेश गावकर, विधानसभा समन्वयक राजू राठोड, खुडी सरपंच दीपक घाडी, शिवसेना विभागप्रमुख कांता गावकर, युवासेना विभागप्रमुख गणेश वाळके, तांबळडेग शाखाप्रमुख राजेंद्र उपानेकर, युवासेना शाखाप्रमुख रोशन कोयंडे, विठ्ठलदाय राजम, वृषाली कुमठेकर, संतोष कोयंडे, संचिता कोयंडे, खुडी शाखाप्रमुख काशीराम घाडीगावकर, युवासेना शाखाप्रमुख संदीप घाडी, मांगरीश घाडी, शशिकांत कावळे, निलेश कामतेकर, विश्वनाथ घाडी, हिंदळे सरपंच मकरंद शिंदे,उपसरपंच रुपेश राणे, शाखाप्रमुख महेश कोळंबकर, युवासेना शाखाप्रमुख सागर तेली, मंगेश मयेकर, परेश खोट, सुभाष तेली, संदीप हिंदळेकर, मुणगे शाखाप्रमुख धाकोजी सावंत, शिवदास रासम, विकास बांदेकर, युवासेना शाखाप्रमुख स्वप्निल नाटेकर, प्रमोद वळंजू, गुरूदास धुवाळी, प्रमोद सावंत, प्रसाद लाड, संतोष पाडावे,सुजित पाडावे आदी शिवसैनिक युवासैनिक व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!