*कोकण Express*
*कणकवलीत युवासेना आणि भाजपा युवा मोर्चाने आरटीओ अधिकाऱ्यांची कारवाई रोखली…!*
*जनतेच्या प्रश्नावर सेना- भाजप पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे एकमत…!*
*कणकवलीत ः प्रतिनिधी*
कणकवली तहसिल कार्यालय परिसरात दुचाकी घेवून आलेल्या नागरिकांवर चुकीच्या पध्दतीने हॅल्मेट व इतर कागदपत्रे नसल्याचे कारण देवून 5 हजार , 3 हजार अशी दंडात्मक कारवाई सुरु केली होती. या चारही आरटीओ अधिकाऱ्यांना युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक , माजी नगरसेवक कन्हैया पारकर यांच्यासह नागरिकांनी जाब विचारला. संबंधित अधिकाऱ्यांनी तहसिलदारांच्या निदर्शनास बाब आणून दिल्या नंतर सर्वजण तहसिलदार दिक्षांत देशपांडे यांच्या दालनात आले. त्याठिकाणी कुठलीही परवानगी न घेता ही कारवाई केल्याचे उघड झाले. दरम्यान भाजपा युवामोर्चा अध्यक्ष संदिप मेस्त्री देखील या ठिकाणी दाखल झाले.दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आरटीओ ची मनमानी रोखण्यासाठी दंड रद्द करण्याची मागणी केली. अखेर या वादाच्या कारवाई बाबत तहसिलदारांनी प्रिवियन्स रिपोर्ट करण्याचे सुचवले आणि पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
यावेळी सचिन सावंत , राजु शेटये , संतोष पुजारे , भाजपाचे महेश लाड , पप्पू यादव समीर प्रभुगांवकर यांच्यासह सेना भाजप या दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची!
कणकवली तहसिलदार कार्यालय परिसरात अचानक पणे अधिकाऱ्यांनी दंडात्मक कारवाई सुरु केली. सर्वसामान्य नागरिक यामुळे संतप्त झाले. आरटीओ अधिकाऱ्यांना या दंडात्मक कारवाईचा जाब विचारला त्यामुळे अधिकारी आणि सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली.
*कारवाईबाबत जनजागृती होणे गरजेचे*
महामार्गावर आरटीओ कडून होणारी कारवाई वाहन चालकांना माहिती आहे. मात्र एखाद्या ठिकाणी अचानकपणे होणारी कारवाई आणि तीही सरकारी कार्यालयांच्या बाहेरील यावर उलट सुलट चर्चा सुरू होती. त्यातच अधिकाऱ्यांकडून तहसीलदारांना या कारवाईबाबत माहिती असल्याचे सांगण्यात आल्याने थेट तहसीलदारांसमोरच याचे बिंग फुटले. यामुळे जनजागृती शिवाय केल्या गेलेल्या या कारवाईबद्दल नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया सर्वसामान्यांमधून व्यक्त होत होत्या
कारवाई बाबत सेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे एकमत!
आरटीओ कडून तहसीलदार कार्यालय परिसरात अचानकपणे वाहनचालकांनवर झालेल्या कारवाई वेळी कारवाई वेळी सेना भाजपच्या पदाधिकाऱ्यानी धाव घेतली इतर वेळी वेगवेगळ्या घटनेवर भिन्नता असणाऱ्या या राजकीय पक्षांनी ही कारवाई चुकीच्या पद्धतीने चालली असून वाहन चालकांची दंडात्मक रक्कम परत मिळावी यावर एकमत दाखवल्यामुळे वाहन चालकांमधून देखील समाधान व्यक्त केले.

