नवीन कुर्ली प्राथमिक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदी अमित दळवी यांनी निवड

नवीन कुर्ली प्राथमिक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदी अमित दळवी यांनी निवड

*कोकण Express*

*नवीन कुर्ली प्राथमिक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदी अमित दळवी यांनी निवड*

आज नवीन कुर्ली प्राथमिक शाळा येथे शाळेच्या मुख्याध्यापिका रेणुका जोशी यांच्या उपस्थितीत शाळा व्यवस्थापन समिती गठीत करण्यात आली आणि अध्यक्ष पदी अमित दळवी ,उपाध्यक्ष पदी मानसी चव्हाण, सचिव पदी रेणुका जोशी तर सदस्य पदी विनायक कुबडे, प्राणिशा शेळके, दिलीप आडे, शमिका होळकर, प्रगती पार्टे, अनिल सावंत, आदिती वाघाटे, निशा निकम, सखाराम हुंबे, मंगेश मडवी, रवींद्र नवाळे, सुनील गोसावी, मीनाक्षी वरवडेकर, यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या वेळी माजी अध्यक्ष राजेंद्र कोलते यांचे शाळेकडून आभार व्यक्त करण्यात आले तसेच नवीन पदाधिकारी आणि सदस्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
या वेळी बोलताना शाळेचा सर्वांगिण विकास, प्रगती आणि शाळेचे नाव उज्वल करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत अशी ग्वाही नूतन अध्यक्ष अमित दळवी यांनी दिली. या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक, पालक, ग्रामस्थ आणि शिक्षण प्रेमी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!