भिरवंडे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये धनशक्तीचा पराभव

*कोकण Express*

*भिरवंडे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये धनशक्तीचा पराभव*

 *शिवसेना नेते जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचा आरोप*

*तोंडवली बावशी ग्रामपंचायतीची सत्ता शिवसेनेच्या अंतर्गत वादातून गेली*

​*कणकवली ः प्रतिनिधी*

​कणकवली तालुक्यात भिरवंडे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये धनशक्तीचा पराभव झाला याचा आम्हाला आनंद आहे. शिवसेना तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत यांनी आखलेल्या रणनितीतून व शिवसैनिकांनी केलेल्या कामातून भिरवंडेतील तीनही जागांवर शिवसेनेने विजय मिळवला. शिवसेनेची ताकद वाढत असताना ​२०२४ च्या निवडणुकीत आमदार नितेश राणे यांना मोठा धक्का मिळेल असा दावा शिवसेना नेते सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी केला. तोंडवली बावशी ग्रामपंचायतीची सत्ता ही शिवसेनेमधील अंतर्गत वादातून गेली आहे. तेथे भाजपची ताकद नाही असेही सावंत यांनी सांगितले. भिरवंडे येथे मूळ भाजपा नव्हतीच. समर्थक भाजपा तेथे उदयाला येत होती. ती शिवसैनिकांनी रोखली असा टोला सतीश सावंत यांनी लगावला. नितेश राणे यांना ही धक्क्याची सुरुवात असल्याचा टोला सावंत यांनी लगावला. या निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाविकास आघाडीचे ​७० टक्के सरपंच विराजमान करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे सावंत यांनी सांगितले. सरपंच निवडीवेळी धनशक्तीचा धोका आहे ​; ​मात्र त्यावेळी जी काळजी घ्यायला हवी ती आम्ही निश्चितपणे घेऊ असे  सावंत यांनी सांगितले. यावेळी शिवसेना नेते संदेश पारकर व शिवसेनेचे तीनही विजयी उमेदवार व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!