*कोकण Express*
*मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम तात्काळ पुर्ण व्हावे…*
*सावंतवाडी पत्रकार संघाची मागणी; महामार्गावरील खड्ड्यांकडे वेधले प्रशासनाचे लक्ष…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. अपघाताची शक्यता लक्षात घेता, हे खड्डे तात्काळ बुजविण्यात यावेत तसेच रखडलेले चौपदरीकरणाचे काम तात्काळ पुर्ण करण्यात यावे, अशी मागणी सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या माध्यमातून आज प्रशासनाकडे करण्यात आली.
याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी कार्यालयाचे नायब तहसिलदार संतोष बांदेकर यांच्याकडे देण्यात आले. यावेळी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार,सचिव मयुर चराठकर, राज्य पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष गजानन नाईक, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे,अण्णा केसरकर,डीजीटल मिडीयाचे जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर,खजिनदार रामचंद्र कुडाळकर, नरेंद्र देशपांडे,शैलेश मयेकर,संतोष सावंत,भुवन नाईक,नितेश देसाई,प्रसाद माधव,मंगल नाईक आदी उपस्थित होते. यावेळी पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात असे नमुद करण्यात आले आहे की,
मुंबईतून तळ कोकणात येणाऱ्या महामार्गाचे काम अतिशय धिम्यागतीने सुरू असून या मार्गाची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली आहे. तसेच १२ वर्षे होऊन देखील महामार्ग चौपदरीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही. सरकारने अनेक दावे केले मात्र महामार्ग अपूर्णच. त्यामुळे लवकरच मार्गाची दुरुस्ती होण्यासाठी प्रयत्न व्हावेत

