सिंधुदुर्ग भाजपा जिल्हाध्यक्ष मा प्रभाकर सावंत आणि भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये सिंधुदुर्ग रेल्वेस्थानक सुशोभीकरण कामाचा शुभारंभ

सिंधुदुर्ग भाजपा जिल्हाध्यक्ष मा प्रभाकर सावंत आणि भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये सिंधुदुर्ग रेल्वेस्थानक सुशोभीकरण कामाचा शुभारंभ

*कोकण Express*

*सिंधुदुर्ग भाजपा जिल्हाध्यक्ष मा प्रभाकर सावंत आणि भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये सिंधुदुर्ग रेल्वेस्थानक सुशोभीकरण कामाचा शुभारंभ*

पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठी निर्माण केलेल्या अमृत भारत स्थानक योजनेतील 508 रेल्वे स्थानकांचा लोकार्पण सोहळा ६ ऑगस्ट रोजी संपन्न झाला.या योजनेत राज्यातील 44 स्थानकांचा समावेश आहे.
याच धर्तीवर राज्याचे बांधकाम मंत्री मा ना रविंद्रजी चव्हाण यांच्या पुढाकाराने उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच मा नारायणराव राणे यांच्या सहकार्याने कोकण रेल्वेच्या १२ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास आराखडा तयार करण्यात आला असून यावर्षीच्या बजेट मध्ये यासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार रेल्वे स्थानकांचा यात समावेश असून याद्वारे स्थानकांना जोडणाऱ्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण,स्थानक परिसर विकास,पार्किंग,गार्डन तसेच मूलभूत सुविधांचे बळकटीकरण करण्यात येणार आहे. या योजनेमधून सदरची स्थानके हाय फाय होणार आहेत.
जिल्ह्यातील सावंतवाडी कुडाळ सिंधुदुर्ग व कणकवली अशी चार स्थानके योजनेत असून आज मंगळवारी या चारही रेल्वे स्थानकांच्या कामाचा शुभारंभ मा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शुभहस्ते तसेच केंद्रीय मंत्री ना नारायणराव राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस,ना अजितदादा पवार,बांधकाम मंत्री ना रविंद्रजी चव्हाण व मान्यवरांचा उपस्थितीत आभासी पद्धतीने संपन्न झाला .
यावेळी भारतीय जनता पार्टीच्या वतीने सिंधुदूर्ग रेल्वे स्थानकावर मा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,आनंद ऊर्फ भाई सावंत, तसेच निवासी जिल्हाधिकारी, श्री. मच्छिंद्र सुकटे, भाजपा ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल,सुप्रिया वालावलकर,गोपाळ हरमलकर,सरपंच परशुराम परब, ओरोस सरपंच आशा मुरमुरे,सुभाष बांबूळकर,गौरव घाडीगांवकर नवीन बांदेकर आदी मान्यवर उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!