फोंडाघाट बस स्थानक प्रमुखांना उबाठा शिवसैनिकांनी घेराव घालून विचारला जाब

फोंडाघाट बस स्थानक प्रमुखांना उबाठा शिवसैनिकांनी घेराव घालून विचारला जाब

*कोकण Express*

*फोंडाघाट बस स्थानक प्रमुखांना उबाठा शिवसैनिकांनी घेराव घालून विचारला जाब*

*फोंडाघाट ः प्रतिनिधी*

फोंडाघाट एस टी बसस्थानक मधील शौचालयात दूषित पाणी सोडून लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या तसेच शासनाचा लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या शोचालया ची झालेली दुरावस्था याकरिता फोंडाघाट उबाठा शिवसैनिकांकडून येथील डेपो मॅनेजर यांना सकाळी घेराव घालून जाब विचारण्यात आला तसेच यासंबंधित वरिष्ठ अधिकारी यांनी आठ दिवसात येथे येऊन योग्य टी कार्यवाही न केल्यास उबाठा शिवसैनिकांकडून सेना स्टाईल ने आंदोलन करून या फोंडाघाट डेपो ला लॉक घालण्यात येईल असा इशारा उबाठा शिवसेनेचे उपतालुका प्रमुख राजू राणे यांनी दिला

आहे

मागील कित्येक वर्षापासून जीर्ण झालेल्या अवस्थेत असलेल्या फोंडाघाट बसस्थानक आवारातील विहिरी ची कोणतीही दुरुस्ती किंवा पाणी उपसा किंवा पाण्याची स्वच्छता न करता शासनाचा लाखो रुपये खर्चून या विहिरी मध्ये पंप सोडून पाईप लाईन करून याचे पाणी शौचालयाच्या टाकीमध्ये सोडण्यात आले हे पाणी फोंडाघाट बसस्थानकामध्ये येणारे एस टी चे चालक वाहक तसेच प्रवासी आणी फोंडाघाट वासियांनी वापरल्यास आजार पसरण्याची शक्यता असल्याने आज येथील उबाठा शिवसैनिकानी तात्काळ दखल घेत फोंडाघाट बसस्थानकाच्या प्रमुखांना याबाबत जाब विचारला तसेच शासनाचा लाखो रुपये खर्च करून सुसज्ज असा बांधण्यात आलेला शोचालय आज अस्वछ आणी मोडकळीस आलेल्या स्थितीत असून याबाबत आठ दिवसात दखल घेऊन एस टी प्रशासनाने योग्य टी कार्यवाही न केल्यास फोंडाघाट उबाठा शिवसेनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येऊन येथील बसस्थानकाला लॉक घालण्यात येईल असा इशारा उबाठा शिवसेनेचे उपतालुका प्रमुख राजू राणे यांनी दिला. यावेळी येथील उबाठा शिवसेनेच्या महिला प्रमुख माधवी दळवी, महिला उपतालुका प्रमुख सजना कोलते, प्रतिभा अवसरे, पूर्वी साटम, दिव्या गोसावी, तृप्ती सावंत पटेल, शहर प्रमुख रवींद्र पाटकर, भालचंद्र उर्फ राजा साटम, ध्रुवा गोसावी, शाम भोवड, युवक शिवसेना विभागप्रमुख बंटी वरुणकर, सुरेश टक्के, अनिल पटेल, भाई सावत, चैतन्य सावत, यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!