सावंतवाडी रेल्वे स्टेशनला पायाभूत सुविधांसाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे मंत्र्यांची भेट घेणार राजन तेली

सावंतवाडी रेल्वे स्टेशनला पायाभूत सुविधांसाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे मंत्र्यांची भेट घेणार राजन तेली

*कोकण Express*

*सावंतवाडी रेल्वे स्टेशनला पायाभूत सुविधांसाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे मंत्र्यांची भेट घेणार राजन तेली*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

सावंतवाडी रेल्वे स्टेशनवर रेल्वे टर्मिनस व्हावे म्हणून पायाभूत सुविधांसाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला होता पण दुसऱ्या टप्प्यातील कामे न करता निधी परत गेला आहे तो पुन्हा मिळवून देण्यासाठी व रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा म्हणून रेल्वेमंत्री, रेल्वे राज्यमंत्री यांची भेट घेऊन पाठपुरावा केला जाईल असा विश्वास माजी आमदार राजन तेली यांनी व्यक्त केला. सावंतवाडी रेल्वे स्टेशनवर रेल्वे टर्मिनस व्हावे म्हणून पायाभूत सुविधाची निर्मिती करण्यासाठी रेल्वेमंत्री, मुख्यमंत्री, मंत्री आदींच्या उपस्थितीत

भूमिपूजन झाले. त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला मात्र दुसऱ्या टप्प्यातील कामे न करता निधी परत गेला याबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांवर राजन तेली बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, मंडल अध्यक्ष रवींद्र मडगावकर, महेश धुरी, एकनाथ नाडकर्णी, दोडामार्ग अध्यक्ष सुधीर दळवी, शहराध्यक्ष अजय गोंदावळे, आनंद नेवगी आदी उपस्थित होते.

सावंतवाडी रेल्वे स्टेशनवर रेल्वे टर्मिनस कहावे म्हणून पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी भूमिपूजन झालेल्या कामांचे दुसऱ्या टप्प्यातील कामे न

करता निधी परत गेला आहे तर तो मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. तसेच रेल्वे स्टेशनवर रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा म्हणून प्रयत्न केला जाईल, त्यासाठी रेल्वे मंत्री, रेल्वे राज्यमंत्री यांची दिल्लीत भेट घेऊन पाठपुरावा केला जाईल असे राजन तेली यांनी सांगितले कोकणातील रेल्वे स्टेशनांचे शुशोभिकरण, रेल्वे स्टेशनवर पर्यंत रस्ता तयार करण्यासाठी शंभर कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून उद्या मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण आदींच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात येणार आहे असे राजन तेली यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!