*बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये कै. सिद्धेश गाळवणकर यांना श्रद्धांजली अर्पण*

*बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये कै. सिद्धेश गाळवणकर यांना श्रद्धांजली अर्पण*

*कोकण Express*

*बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये कै. सिद्धेश गाळवणकर यांना श्रद्धांजली अर्पण*

बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांचे कनिष्ठ बंधू सिद्धेश गाळवणकर यांचे नुकतेच आकस्मिक निधन झाले.
बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या स्थापनेपासून ते आज तगायत बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये सदस्य आणि कर्मचारी म्हणून ते सेवा बजावत होते.
बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचा पहिला अभ्यासक्रम -महिला बी.एड. कॉलेज च्या स्थापनेपासून उमेश गाळवणकर व तत्कालीन संस्था संस्थापक यांच्या खांद्याला खांदा लावून निष्ठेने व प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांमध्ये सिद्धेश गाळवणकर यांची गणना केली जाते. स्वभावातील साधेपणाने, सरळ मार्गी, सालस असलेले सिद्धेश गाळवणकर प्रसिद्धीपरानमुख राहून बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये पोट तिडकीने, विश्वासू व तळमळने काम करणाऱ्यांमध्ये अग्रणी होते‌. त्यांच्या आकस्मिक निधनाने शिक्षण संस्थेमध्ये एक पोकळी निर्माण झाली आहे.
शिक्षण संस्थेतील त्यांच्या योगदानाचा आढावा घेऊन बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेच्या विविध अभ्यासक्रमातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी विविध अभ्यासक्रमाचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!