*कोकण Express*
*सिंधुदुर्ग जिल्हा परिषद भवनाची छप्पर दुरुस्ती सुरू असताना पत्र्याच्या शेड वरून दोन कामगार घसरून एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर!*
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची छप्पर गळती रोखण्यासाठी इमारतीवर पत्र्याची शेडचे काम सुरू असताना शनिवारी सकाळी साडे आठच्या दरम्याने आहे एका पाठोपाठ एक असे दोन कामगार घसरून दुमजली इमारतीवरून खाली कोसळल्यामुळे उत्तर प्रदेश रायपुर येथील एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या कामगार गंभीर जखमी झाला. सन 1992 मध्ये या भवनाची निर्मिती होत असताना या इमारतीच्या स्लॅब वरून पडून एका कामगाराचा असाच मृत्यू झाला होता त्या दुर्देवी अपघाताची पुन्हा आठवण झाली. सिंधु नगरी येथील प्रशासकीय भवनात मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची दुमजली भव्य इमारत असून छप्पर गळतीमुळे या इमारतीवर पत्राचे शेड घालण्याचे काम सुरू होते. जिल्हा परिषदेने या कामाचा ठेका एका मक्तेदार कंपनीला दिला होता. शेडचे काम अंतिम टप्प्यात होते. या कामाची निविद्या प्रक्रिया व प्रशासकीय मान्यता पूर्ण करून मागच्या सुरुवातीला या कामास प्रारंभ झाला होता व हे काम अंतिम टप्प्यात आले असताना शनिवारी हा अपघात झाला. या कामावर एकूण 19 कामगार होते. शनिवारी सकाळी हे कामगार छपरावर असताना पाऊस सुरू झाला व या पावसामुळे पहिला एक कामगार घसरून बिल्डिंगच्या खाली कोसळला. त्याच्या डोक्यात गंभीर दुखापत झाल्यामुळे तो कोमात गेला. जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यावर त्याला मृत घोषित करण्यात आले. दरम्यान त्यानंतर आणखी एक दुसरा कामगार असाच घसरून खाली कोसळला व तो गंभीर जखमी झाला. त्यालाही लागलीच जिल्हा रुग्णालयात हलविण्यात येऊन त्याच्यावर उपचार
सुरू आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या या प्रशासकीय भावनांची निर्मिती १९९२-९३ मध्ये सुरू असताना या इमारतीच्या स्लॅब वरून खाली कोसळून एका कामगाराचा मृत्यू झाला होता. त्या दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती पुन्हा घडली. ठेकेदार कंपनीने या कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कामाच्या ठिकाणी सेपटी मेजर लावले होते मात्र तरीही या अपघातात एका कामगाराचा बळी गेला आहे. तर दुसरा कामगार मृत्यूशी झुंज देत आहे.

