पालकमंत्री रवींद्र चव्हाण करणार महामार्गाच्या कामाची पाहणी

पालकमंत्री रवींद्र चव्हाण करणार महामार्गाच्या कामाची पाहणी

*कोकण Express*

*पालकमंत्री रवींद्र चव्हाण करणार महामार्गाच्या कामाची पाहणी*

*टोल नाका चालू करण्याच्या हालचालीच्या पार्श्वभूमी दौऱ्याला महत्त्व प्राप्त*

*पालकमंत्र्यांच्या दौन्याकडे जिल्ह्याचे लक्ष*

*सार्वजनिक बांधकाम, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे दि. 29 व 30 में 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौन्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.*

सोमवार, दिनांक 29 मे 2023 रोजी सकाळी 6.50 वा. गोवा ( दाबोलिम) विमानतळ येथे आगमन व केसरी जि. सिंधुदुर्गकडे प्रयाण. सकाळी 8.30 वा. कैसरी येथे आगमन व राखीव. सकाळी 9.30 वा. कैसरी येथून ओरोस कडे प्रयाण. सकाळी 11.00 वा. ओरोस येथे आगमन व सिंधुदुर्ग भरडधान्य अभियान कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ नवीन जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग) दुपारी 12.30 ते 1.00 वा. हळद लागवडी संदर्भातील नियोजबाबत बैठक (स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग) दुपारी 1.00 वा. ते 2.00 वा. राखीव. दुपारी 3.00 वा. मोदी @9 अभियानांतर्गत रत्नागिरी व सिंधुदुर्ग लोकसभा क्षेत्रातील उपक्रमासंदर्भात नियोजन बैठक (स्थळ- शासकीय विश्रामगृह, कणकवली). सायं 5.00 वा. पत्रकार परिषद ( स्थळ- शासकीय विश्रामगृह, कणवकली) सायं 6.00 वा. ते 8.00 वा. राखीव रात्री 8.00 वा. कणकवली येथून केसरीकडे प्रयाण. रात्री 9.30 वा केसरी येथे आगमन व राखीव.

मंगळवार, दि. 30 मे 2023 रोजी सकाळी 7.00 वा. कैसरी येथून झारापकडे प्रयाण. सकाळी 8.00 वा. झाराप येथे आगमन व झाराप येथून मुंबई-गोवा महामार्ग पाहणीस सुरुवात. सकाळी 8.00 वा. ते 9.00 वा. मुंबई – गोवा महामार्ग पॅकेज 10 झाराप ते कलमठ या 44 किमी ची पाहणी सकाळी 9.00 ते 9.15 वा. मुंबई-गोवा महामार्ग पॅकेज 9 कलमठ ते कणकवली या 8 किमी ची पाहणी. सकाळी 9.15 वा. ते 10.00 वा. हॉटेल आशिष येथे आगमन व राखीव. सकाळी 10.00 वा. ते 10.30 वा. मुंबई-गोवा पॅकेज 9 कणकवली ते तळगाव या 31 किमी ची पाहणी सकाळी 10.30 वा. ते 11.00 वा. मुंबई-गोवा महामार्ग पॅकेज 8 तळगाव ते वाकेड या 35 किमीची पाहणी सकाळी 11.00 वा. ते 12.00 वा. मुंबई – गोवा महामार्ग पॅकेज 7 वाकड ते कांटे या 51 किमी ची पाहणी, दुपारी 12.00 वा. ते 1.00 वा. मुंबई-गोवा महामार्ग पॅकेज 6 काटे ते आरवली या 40 किमी ची पाहणी. दुपारी 1.00 वा. ते 2.00 वा. मुंबई-गोवा महामार्ग पॅकेज 5 आरवली ते चिपळूण या 25 किमी ची पाहणी. दुपारी 2.00 वा. ते 3.30 वा. चिपळूण शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!