कणकवलीत भाजप शहर संपर्क कार्यालयाचे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न

कणकवलीत भाजप शहर संपर्क कार्यालयाचे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न

*कोकण Express*

*कणकवलीत भाजप शहर संपर्क कार्यालयाचे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न*

*कणकवली ः प्रतिनिधी*

नगरपंचायत कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून कणकवली शहरात भाजपच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन शनिवारी सकाळी १०:३० वाजता आ. नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. कणकवली कंजूमर सोसायटी समोर नगरपंचायत रोडलागत सदरचे कार्यालय सुरू करण्यात आले असून, कणकवली नगरपंचायतवर प्रशासक आल्यानंतर लोकनियुक्त नगरसेवक निवडीपर्यंत या कार्यालयाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी या कार्यालयाचा उपयोग केला जाणार असल्याचे यावेळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यानी सांगितले.

यावेळी बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले, कणकवली नगरपंचायत क्षेत्रामध्ये गेल्या पाच वर्षात माजी नगराध्यक्ष समीर नलावडे आणि शहराचे सर्वच लोकप्रतिनिधी आणि भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी यांनी एकत्र मिळून शहरामध्ये आदर्श जनसंपर्क कसा असावा याचा आदर्श घालून दिला आहे. दाखल्यापासून ते मोठ्या प्रकल्पांपर्यंत छोटी मोठी काम आपल्या शहरात सुरू केली. कार्यकाळ संपल्यानंतर निवडणुका लागेपर्यंत सत्ता असो किंवा नसो लोकांची सेवा आम्ही करत राहू. या दृष्टिकोनातून टाकलेलं हे अतिशय महत्त्वाचं आणि समाधानकारक पाऊल आहे. त्यामुळे सतत आम्ही जनतेच्या संपर्कात राहू, जनतेच्या कुठच्याही अडीअडचणी असतील ते त्या सोडवण्यासाठी वर्षनुवर्ष केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भारतीय जनता पक्षाचे सर्वच कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्र येऊन लोकांची सेवा करत आहेत.

पुढे बोलताना ते म्हणाले, आता आम्हाला सेवा करण्यासाठी एक पत्ता मिळालेला आहे आणि त्या पत्त्यावर आल्यानंतर कोणीही खाली हात जाणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असही आमदार नितेश राणे उद्घाटन प्रसंगी म्हणाले.

यावेळी आमदार नितेश राणे, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, गटनेते संजय कामतेकर, माजी नगरसेवक अॅड. विराज भोसले, शिशिर परुळेकर, अभिजित मुसळे, कविता राणे, मेघा गांगण तसेच गणेश तळगावकर, बडू गांगण, अभय राणे, महेश सावंत, किशोर राणे, जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई, चारुदत्त साटम, सुशील पारकर, राजश्री धुमाळे, संजना सदडेकर, शहराध्यक्षा प्राची कर्पे, साक्षी वाळके सागर राणे शिवसुंदर देसाई यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!