*कोकण Express*
*पोलीस इन्स्पेक्टर दयानंद विठ्ठल सावंत (मुंबई) यांचे कुडाळ एस आर एम कॉलेज येथे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन*
*75000 जागांची विविध खात्यातील बंपर भरती लवकरच*
*शिरवल गावचे सुपुत्र पीएसाय ते थ्री स्टार पोलीस इन्स्पेक्टर प्रवास; एक बहुआयामी समाजिक दायित्व निभवणारे पोलीस अधिकारी*
*जिल्ह्यातील प्रत्येक घरात किमान एक सरकारी अधिकारी निर्माण करणे युनिक चे ध्येय्य – सचिन कोर्लेकर*
*युनिकचे 5 मे पासून नियमित वर्ग ; 3 व 4 मे रोजी डेमो लेक्चर*
*सिंधुदुर्ग*
आगामी 75000 जागांची विविध खात्यातील बंपर भरती शासनाच्या वतीने होणार आहे या संदर्भात शिरवल गावचे सुपत्र आणि मुंबई चे धडाडीचे कर्तबगार पोलीस इन्स्पेक्टर मा.दयानंद सावंत यांचे मोफत मार्गदर्शन उद्या स 11 वा. संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ येथे मोफत मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे. मुंबईत अधिकारी असताना आपल्या शिरवल गावापासून गरजू होतकरू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि आर्थिक मदत करत सामाजिक दायित्व जपणारे कर्तव्यदक्ष नामांकित पोलीस अधिकारी म्हणून मुंबईत कार्यरत आहेत अशा या जिल्ह्यातील भूमिपुत्र आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा ‘पीएसाय ते थ्री स्टार पोलीस इन्स्पेक्टर चा’ प्रवास जिल्ह्यातील विद्यार्थी व पालकांनी उपस्थित राहून समजून घ्यावा तसेच पालकांनी आता स्पर्धा परीक्षेतून आपली मुले अधिकारी लवकरात लवकर कशी घडतील याकडे लक्ष दिले तर जिल्ह्यातील प्रत्येक घरात किमान एक सरकारी अधिकारी नक्कीच घडवण्यात आपण यशस्वी होऊ असा विश्वास वाटतो त्यासाठी अशा मार्गदर्शनाला घेण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन युनिक सिंधुदुर्ग चे संचालक सचिन कोर्लेकर यांनी केले आहे.
एकाच अभ्यासक्रमावर आधारित आगामी
तलाठी नगरपालिका कृषी जिल्हा परिषद अशा क्षेत्रातील सरकारी पदांच्या परीक्षेकरिता युनिक चे नियमित प्रशिक्षण वर्ग 5 मे 2023 पासून सुरु होत आहेत. यामध्ये युनिक चे यशस्वी यशवंत यांचे विशेष मार्गदर्शन, तज्ञ फॅकल्टी , माफक फी,अभ्यासिका, सराव परीक्षा यामुळे जिल्ह्यात युनिक चे अनेक विद्यार्थी विविध पदांवर कार्यरत आहेत. आगामी भरती साठी कुडाळ व कणकवली येथे युनिक चे नियमित वर्ग 5 मे पासून सुरु होणार असून विद्यार्थ्यांनी 3 व 4 मे रोजी होणाऱ्या डेमो लेक्चर साठी उपस्थित रहा अधिक माहितीसाठी 9689414974/9960658458 या क्रमांकावर संपर्क साधावा.