शिक्षणप्रेमी संतोष ताम्हणकर यांचे निधन

शिक्षणप्रेमी संतोष ताम्हणकर यांचे निधन

*कोकण Express*

*शिक्षणप्रेमी संतोष ताम्हणकर यांचे निधन*

*कासार्डे ; संजय भोसले*

साळिस्ते ताम्हणकरवाडी येथील संतोष यशवंत ताम्हणकर यांचे अल्पशा आजाराने बुधवारी रात्री निधन झाले. ते 45 वर्षांचे होते. त्यांच्यावर साळिस्ते येथील स्मशानभूमीत गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

साळिस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं. 1 च्या शाळा व्यवस्थापन समितीचे ते अध्यक्ष होते. साळिस्ते शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती म्हणून अध्यक्षपद सलग तीन वेळा त्यांनी भूषविले आहे. शैक्षणिक विकासासाठी नेहमीच त्यांनी आपला हात पुढे केला.

गेले काही दिवस ते अल्पशा आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर उपचार सुरु असताना कणकवली येथे त्यांची प्राणज्योत मालवली. मजुरी करुन गुजरान करत असुनही त्यांचे शिक्षणावर नेहमीच प्रेम दिसून आले. आपल्या शाळेतील मुलांना विविध प्रकारे मदत केली. त्यान्च्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली असा परिवार आहे. त्यान्च्या निधनानंतर साळिस्ते सरपंच प्रभाकर ताम्हणकर, जिल्हा परिषद शाळा, कर्मचारी व ग्रामस्थ यांनी श्रन्ध्दाजंली अर्पण केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!