कणकवली बाजारपेठ झेंडाचौकात भीषण आग

*कोकण Express*

*कणकवली बाजारपेठ झेंडाचौकात भीषण आग…!!!*

*दोन दुकाने जळून खाक ; शेजारील घरालाही झळ
अग्नी प्रलय सुरूच*

*कणकवली ः प्रतिनिधी संजना हळदिवे*

कणकवली बाजरपेठेत पहाटे 3 वा च्या सुमारास आगीचा प्रचंड प्रलय सुरू झाला कणकवली झेंडाचौक येथील जय भारत कोल्ड्रिंक्स हाऊसचे दुकान जळून खाक झाले असून त्या शेजारील रामचंद्र बाबाजीशेठ उचले किराणा आयुर्वेदिक दुकान आगीच्या भक्षस्थानी आले तर कोल्ड्रिंक्स हाऊस शेजारील अंधारी ब्रदर्स यांच्या दुकान व राहत्या घराला ही आगीची झळ पोहचली .कणकवली नगरपंचायतीच्या अग्निशामक बंबाद्वारे आग विझविण्याचा प्रयत्न सुरू असला तरी पहाटे 5 30 पर्यंत आग आटोक्यात आली नव्हती.


कणकवली झेंडा चौक येथील 3 दुकाने आगीच्या भक्षस्थानी सापडले.या आगीचे नेमके कारण समजले नसले तरी ही आग शॉट सर्किटने आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. पहाटे 3 वा सुमारास जयभारत कोल्ड्रिंक्स हाऊस मधून मोठ्या प्रमाणत धुराचे व आगीचे लोट येवू लागले या दरम्यान शेजारील राहत्या घरातील नागरिकांना याबाबत कल्पना आल्या नंतर त्याने तात्काळ याची माहिती दिली.तो पर्यंत आगीने रौद्ररूप धारण करण्यास सुरुवात केली होती.या आगीने जयभारत कोल्ड्रिंक्स हाऊसला गिळणकुत करतानाच ही आग उचले किराणा दुकानाच्या दिशेने सरकली.त्याचप्रमाने अंधारी यांच्या दुकान व घराच्या दिशेने आगीचे लोट सुरू झाले होते.

त्यानंतरकणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांना याबाबतची माहिती दिल्या नंतर त्यांनी तातडीने न.प.चा अग्नी शामक बंब बोलविला. व आग आटोक्यात आनन्याचा प्रयत्न केला.मात्र आग आटोक्यात येत नव्हती भर बाजारपेठेत हेअग्नी तांडव सुरू झाल्याने आकाशात धुराचे लोढ व आगीच्या ज्वाळा दिसत होत्या.नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह नगरसेवक कन्हैया पारकर,पोलीस निरीक्षक संजय धुमाळ,भाई साटम,प्रसाद अंधारी,अमित सापळे,नाना सापळे,प्रद्युम मुंज,कणकवली नगरपंचायतीचे कर्मचारी व नागरिकांनी मदत कार्य केले.अद्याप ही आग आटोक्यात येत नसून या आगीत दुकान मालक आबा उचले,राजेंद्र बाजाजी,नाथा अंधारी यांचे लाखों रुपयेचे नुकसान झाले आहे.आग आटोक्यात आनण्यासाठी कणकवली न.प.बरोबर मालवण,सावंतवाडी येथील अग्निशामक बंब मागविण्यात आला होता.मात्र हे बंब येण्यास वेळ लागणार असल्याने तसेच शेजारील घरे दाटीवाटीने असल्याने जेसीबीच्या सहाय्याने नुकसान टाळण्याचा प्रयत्न केला जात होता.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!