विश्व वारकरी संघ,पंढरपूर या संघाच्या कोकण विभागीय सचिवपदी ह.भ.प.विजय बाळकृष्ण राणे यांची नियुक्ती

विश्व वारकरी संघ,पंढरपूर या संघाच्या कोकण विभागीय सचिवपदी ह.भ.प.विजय बाळकृष्ण राणे यांची नियुक्ती

*कोकण Express*

*विश्व वारकरी संघ,पंढरपूर या संघाच्या कोकण विभागीय सचिवपदी ह.भ.प.विजय बाळकृष्ण राणे यांची नियुक्ती*

*कासार्डे ; संजय भोसले*

विश्व वारकरी संघ,पंढरपूर या संघाच्या कोकण विभागीय सचिवपदी कणकवली तालुक्यातील कासार्डे-दाबवाडी येथील ह.भ.प.विजय बाळकृष्ण राणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

विजय बाळकृष्ण राणे हे कासार्डे ग्रामपंचायतीमध्ये ग्राम पंचायत सदस्य म्हणून नुकतेच निवडून आले आहेत.तसेच त्यांना धार्मिक व सामाजिक कार्याची विशेष आवड आहे.त्यामुळे त्यांची कोकण विभागीय सचिवपदी निवड करण्यात आली आहे.विश्व वारकरी संघाचे संस्थापक अध्यक्ष- ह.भ.प.जगन्नाथ महाराज देशमुख, राष्ट्रीय अध्यक्ष- ह.भ.प.तुकाराम महाराज चवरे, राष्ट्रीय उपाध्यक्ष- ह.भ.प.बापूसाहेब महाराज ढगे यांच्यावतीने ही निवड जाहीर करण्यात आली आहे.या निवडीबद्दल विजय राणे यांना नियुक्ती पत्र देऊन अभिनंदन करण्यात आले.
विजय राणे हे कासार्डे माध्यमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या याराना मित्र परिवाराचे सक्रीय कार्यकर्ते आहेत.त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!