*कोकण Express*
*भाजपच्या जिल्हाप्रसिद्धी प्रमुखपदी बबलू सावंत*
भारतीय जनता पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हाप्रसिद्धी प्रमुखपदी बबलू सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बबलू सावंत हे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते असून त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या या संधीच सोन करेन असा विश्वास भाजप सिंधुदुर्ग जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बबलू सावंत यांनी व्यक्त केला आहे. यानिवडीबद्दल त्यांचं सर्व स्तरातून कौतुक होतंय.

