*कोकण Express*
*माणगाव धरणवाडी रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामपंचायत विरोधात निषेध करून घंटानाद आंदोलनला सुरूवात …*
*बेजबाबदार ग्रामपंचायत प्रशासनाचा,सरपंचाच्या कर्तव्याचा बेजबाबदारपणांचा निषेध असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला*
*माणगाव ःःप्रतिनिधी
माणगाव धरणवाडी रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांच्या वतीने माजी ग्रामपंचायत सदस्य दीपक कानेकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत समोर घंटानात आंदोलनला सुरुवात झाली.
बेजबाबदार ग्रामपंचायत प्रशासनाचा,सरपंचाच्या कर्तुत्वाचा बेजबाबदारपनाचा निषेध असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेलेला आहे. मात्र या आंदोलनाकडे वरिष्ठ अधिकारी याकडे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष राहून राहिला आहे.