*कोकण Express*
*प्रश्नमंजुषा स्पर्धेत पळसंब नं १ प्रथम….!*
मालवण तालुक्यातील आडवली येथील आर. ए. यादव आडवली येथे आयोजित आंतरराष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आज प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. या स्पधेत श्रावण, आडवली, पळसंब पंचक्रोशीतील शाळांनी सहभाग घेतला होता. त्यास्पर्धेत पळसंब नं .१ शाळेने प्रथम क्रमांक प्राप्त केला. कु. मंथन मुणगेकर व कु. सुरज पळसंबकर या दोन्ही विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक मुख्याध्यापक श्री विनोद कदम, हायस्कुलचे मुख्याध्यापक – श्री. तुषार सकपाळ, सामाजिक कार्यकर्ते श्री अरुण लाड, उपशिक्षिका सौ असरोंडकर सौ, पवार मॅडम या सर्वांचे पळसंब ग्रामस्थाच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.