कुडाळ बसस्थानकासाठी आ.वैभव नाईक यांचा सातत्यपुर्ण पाठपुरावा-ना. अनिल परब

*कोकण Express*

*कुडाळ बसस्थानकासाठी आ.वैभव नाईक यांचा सातत्यपुर्ण पाठपुरावा-ना. अनिल परब*

*कुडाळ गांधीचौक येथील अद्ययावत नवीन बसस्थानकाचे उद्घाटन*

*कुडाळ ः प्रतिनिधी*

कुडाळ गांधीचौक येथील नवीन बसस्थानकाचे आज ऑनलाईन पध्दतीने उद्घाटन परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष ना. अनिल परब यांच्या हस्ते करण्यात आले. तर कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण करण्यात आले. कुडाळ बसस्थानक 1971 पासून कार्यरत आहे. जिल्ह्यातील प्रमुख बसस्थानकांपैकी एक असे हे बसस्थानक आहे. कुडाळ शहरातील बसस्थानक अद्ययावत व्हावे अशी प्रवाशी व नागरीकांची मागणी होती. आमदार वैभव नाईक यासाठी सतत पाठपुरावा करत होते. आता कुडाळ येथील बसस्थानकाची सुसज्ज इमारत पुर्ण झाली असून लोकांची बसस्थानकाची मागणी पूर्ण झाली आहे.कुडाळ हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असून या बसस्थानकामुळे प्रवाशांची चांगल्याप्रकारे सोय होणार आहे. असे प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री ना. अनिल परब यांनी ऑनलाईन संवाद साधत केले.
*यावेळी आ. वैभव नाईक म्हणाले,* अद्ययावत बसस्थानक ही कुडाळ शहराची गरज होती. या नविन बसस्थानकामुळे प्रवाशांची अत्यंत चांगली सोय झाली आहे. नविन बसस्थानकामुळे कुडाळ शहराच्या सौदर्यांतही भर पडली आहे. कुडाळ येथील बसस्थानक विकासासाठी गेली दोन-तीन वर्ष प्रयत्न सुरू होते. या प्रयत्नात एसटी प्रशासन व नगरपालिकेने चांगले सहकार्य केले. त्यामुळे बसस्थानकाचे काम वेळेत पुर्ण झाले. आता बस स्थानकाच्या समोरील रस्त्यासाठी परिवहन मंत्री ना. अनिल परब यांनी 20 लाख रूपये तसेच शेडसाठी 3 लाख रूपये निधीची तरतूद केली आहे. ही दोन्ही कामे लवकरचं पुर्ण होतील आणि प्रवाशांना चांगल्याप्रकारे सोयी-सुविधा उपलब्ध होतील. कुडाळ मध्ये क्रिडांगण झाले, नाट्यगृहाचे काम सुरू आहे, आता सुसज्ज असे गार्डनही होईल. त्यासाठी आपले प्रयत्न आहेत असे सांगितले.
*नगराध्यक्ष ओंकार तेली म्हणाले, एसटी बस स्थानकाचा गेले अनेक वर्षाचा प्रश्न आ. वैभव नाईक यांनी सोडविला आहे. त्यांचे आपण अभिनंदन करतो.असे सांगितले.* अमित सामंत यांनी मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाला कार्यकारी अभियंता विद्या भिलारकर व निवासी जिल्हाधिकारी सौ.शुभांगी साठे या ऑनलाईन सहभागी झाल्या होत्या.

यावेळी नगराध्यक्ष ओंकार तेली, उपसभापती जयभारत पालव, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, अमरसेन सावंत, काका कुडाळकर, राजन नाईक,सुनिल भोगटे, विकास कुडाळकर,सचिन काळप, श्रेया परब, धिरज परब, बाळा वेंगुर्लेकर, अतुल बंगे, संजय भोगटे, अनंत पिळणकर, बाळ कनयाळकर, बाळा कोरगांवकर, संतोष शिरसाट,जीवन बांदेकर, छोटु पारकर, सुशील चिंदरकर तसेच एसटी विभागाचे विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ, विभागीय अभियंता प्रकाश नेरूरकर, आगार प्रमुख सुजित डोंगरे,महाव्यवस्थापक (स्थापत्य विभाग) श्री.कळगी आदींसह कुडाळ शहरातील नगरसेवक, पंचक्रोशीतील विविध गावचे सरपंच, एस.टी.महामंडळातील अधिकारी-कर्मचारी व नागरीक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!