*कोकण Express*
*अपिशेठ गवाणकर अनंतात विलीन*
*हजारो कणकवलीवासियांनी लाडक्या अपिशेठ ना दिला अखेरचा निरोप*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली शहरासह तालुक्यातील सामाजिक , क्रीडा आणि धार्मिक क्षेत्रात अग्रेसर असणारे दानशूर व्यक्तिमत्त्व सुधाकर उर्फ अपिशेठ गवाणकर यांचे मध्यरात्री पावणे दोन वाजण्याच्या सुमारास निवासस्थानी निधन झाले. अपिशेठ या नावाने सुपरिचित असलेल्या दानशूर व्यक्तिमत्वाला अखेरचा निरोप देण्यासाठी कणकवली शहरासह तालुक्यातून हजारोंचा जनसमुदाय लोटला होता. शहरातील नगरपंचायत स्मशानभूमीत त्याच्यावर आज सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. मागील काही वर्षे प्रकृती खालावल्यामुळे त्यांच्यावर घरीच उपचार सूरु होते. कुडाळदेशकर आद्य गौड ब्राम्हण समाज कणकवली तालुकाध्यक्ष तसेच अनेक सामाजिक संघटनांवर त्यांनी काम केले होते. गरजूंना मदत करण्यासाठी त्यांचा हात नेहमी पुढे असे. पटवर्धन चौकातील सामाजिक कार्यकर्ते हर्षल उर्फ राजू गवाणकर आणि गवाणकर हार्डवेअर चे मालक गौरव गवाणकर यांचे ते वडील होत.त्यांच्या पश्चत 2 मुलगे, 2 विवाहित मुली, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे.

