बिजलीनगर प्रहार ऑफिस ते मराठा मंडळ रस्त्याचे काम त्वरित सुरू करा!

बिजलीनगर प्रहार ऑफिस ते मराठा मंडळ रस्त्याचे काम त्वरित सुरू करा!

*कोकण Express*

*बिजलीनगर प्रहार ऑफिस ते मराठा मंडळ रस्त्याचे काम त्वरित सुरू करा!*

*अन्यथा आंदोलन ; विरोधी गटनेता सुशांत नाईक यांचा इशारा!*

*कणकवली ः प्रतिनिधी*

शहरातील बिजलीनगर प्रहार ऑफिस ते मराठा मंडळ हा हॉटमिक्स रस्ता मंजूर होऊन 6 महिने उलटून गेलेत.मात्र अद्याप रस्त्याचे काम सुरू करण्यात आलेले नाही. येत्या 8 दिवसांत या रस्त्याचे काम सुरू न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा या प्रभागाचे नगरसेवक तथा विरोधी गटनेता सुशांत नाईक यांनी नगरपंचायत मुख्याधिकारी अवधूत तावडे यांना निवेदनाद्वारे दिला आहे. ह रस्ता सध्या पूर्ण खड्डेमय झाला असून रस्त्याच्या नूतनीकरण साठी 18 लाखांचा निधीही मंजूर आहे. स्थानिकांकडून वारंवार रस्ता दुरुस्तीची मागणी करण्यात येत आहे.मात्र अजूनही रस्त्याचे काम सुरू केलेले नाही.येत्या 8 दिवसांत रस्त्याचे काम सुरू न केल्यास आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा नाईक यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!