*कोकण Express*
*कोळपे पंचायत समिती मधील नानिवडे गावातील भाजपा ,राणे समर्थक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश….*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
आज कोळपे पंचायत समिती मतदार संघातील नानिवडे गावातील भाजपा , राणे समर्थक कार्यकर्त्यांनी जिल्हा बँक चे अध्यक्ष श्री. सतीश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
यांमध्ये नानिवडे वाडेकर वाडी येथील श्री.दीपक साळवी , प्रवीण वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली*
सिद्धेश साळवी,दत्ताराम जाधव,हरी वाडेकर,सुरेश साळवी,गोविंद वाडेकर,राम गावडे ,बाळकृष्ण साळवी,वनिता वाडेकर,भूमिका गावडे,सुगंधा साळवी,आरती गावडे,वंदना साळवी,सुनंदा गोरुले, वासंती शिवगण,प्रभावती वाडेकर यांसह 60 पेक्षा अधिक ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला .
या वेळी श्री.दीपक साळवी यांची नानिवडे गावचे शाखा प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.तसेच श्री.सूर्यकांत महाजन यांची शाखा संघटक पदी नियुक्ती करण्यात आली.*
यावेळी बोलताना सतीश सावंत म्हणाले , शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीचे शिवसैनिक प्रत्येक घराघरात तयार करा , नानिवडे गावचा सर्वांगीण विकास शिवसेनेच्या माध्यमातून करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल असा विश्वास सतीश सावंत यांनी दिला.
यावेळी सावंत यांच्या सोबत श्री. संदेश पटेल, युवासेना जिल्हा चिटणीस – स्वप्नील धुरी,तालुका संघटक -अशोक रावराणे, उपतालुका प्रमुख- सुरेश पांचाळ, उपतालुका संघटक – बाबा मोरे, विभाग प्रमुख- बाबा खडये,पप्या पालांडे, युवासेना तालुका प्रमुख -अतुल सरवटे, शाखा प्रमुख – सूर्यकांत महाजन यांसह असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.