मनाई आदेशाचा भंग ; ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा,शिंदे गटाची मागणी

मनाई आदेशाचा भंग ; ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा,शिंदे गटाची मागणी

*कोंकण Express*

*मनाई आदेशाचा भंग ; ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा,शिंदे गटाची मागणी*

*प्रवक्ते सुनील पारकर यांनी ठाकरे गटाकडून फटाके फोडणाऱ्यांवर कारवाईची केली मागणी*

*कणकवली : प्रतिनिधी*

मुंबई येथे दसरा मेळावा घेण्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळाले म्हणून कणकवली नरडवे नाका येथे फटाके वाजवून आनंद उत्सव साजरा करनाऱ्या ठाकरे गटाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचे भान राहिलेले नाही. मनाई आदेशाचा उल्लंघन करून त्यांनी कायदा मोडल्या आहे. या प्रकरणी ठाकरे गटाचे जे पदाधिकारी,कार्यकर्ते दोषी आहेत त्यांचेवर गुन्हा दाखल करा अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते सुनील पारकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हा पोलिसांकडे केली आहे. या संदर्भात उद्या सकाळ पर्यंत कारवाई न केल्यास कणकवली पोलीस ठाण्यात निरीक्षकांना निवेदन देणार असल्याची माहिती पारकर यांनी दिली.

जेव्हा उद्योग मंत्री उदय सामंत यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीचा आम्ही निषेध केला, त्या प्रवृत्ती विरुद्ध आवाज उठवला तेव्हा पोलिसांनी आमच्यावर गुन्हे दाखल केले हा कायदा आज मनाई आदेशाचे भंग करणाऱ्या ठाकरे गटाच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना का लागू होत नाही ? असा संतप्त सवालही सुनील पारकर यांनी केला आहे. कोणताही जल्लोष करून विजय मिळत नसतो तर त्यासाठी काम करावे लागते, जनतेची सुखदुःख पहावी लागतात. ठाकरे गटाकडून आजपर्यंत असे कधीच काम करण्यात केलेले नाही.नुसती भाषणे दिली जातात मात्रा मुख्यमंत्री शिंदे त्यांचे मंत्री,आमदार हे जनतेची कामे करतात म्हणूनच जनता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने उभी राहिली आहे. शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी न्यायालयाने ठाकरे गटाला संमती दिली म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करण्याचा अधिकार कोणालाही दिलेला नाही.त्यामुळे ज्याने हे आदेश पायदळी तुडवले आहेत त्यांचेवर तातडीने कारवाई करा अशी मागणी कणकवलीत शिंदे गटाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!