*कोकण Express*
*सावंतवाडी रोटरी क्लब च्या वतीने २० डिसेंबर रोजी विविध आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन..*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
रोटरी या सामाजिक संस्थेचा डिसेंबर हा महीना “रोग प्रतिबंध आणि उपचार” यासाठी ओळखला जातो. या पार्श्वभूमीवर सावंतवाडी रोटरी क्लबच्यावतीने रविवार २० डिसेंबर रोजी नेत्र-तपासणी- शिबीर आणि दंत आणि मुख आरोग्य अशा विविध आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
सध्या कोरोना महामारीचा काळ सुरु असल्याने प्रथम नोंदणी करणाऱ्या ५० लाभार्थ्यांनाच या शिबीराचा लाभ मिळणार असल्याने नेत्र तपासणी शिबीराचा लाभ घ्यावयाचा आहे त्यानी कृपया आपली नावे राणी जानकीबाई रुग्णालय (बाह्य विभाग) ०२३६३२७२०८५ तसेच रो. दिलीप म्हापसेकर ८५५०९७५२४२ इथे नोंदवावीत. तसेच “दंत आणि मुख आरोग्य शिबिरासाठी” नोंदवावयाची आहेत त्यानी आपली नावे डॉ.अनिश स्वार ९७३०३५३३३३ तसेच रो.दिलीप म्हापसेकर ८५५०९७५२४२ इथे नोंदवावीत असे आवाहन सावंतवाडी रोटरी क्लबचे अध्यक्ष रो.डॉ.राजेश नवांगुळ यानी केले आहे. ही दोन्ही शिबिरे वेगवेगळ्या ठिकाणी भरविण्यात येत आहेत. नावे नोंदविल्यानंतर आपल्याला शिबिरांचे ठिकाण आणि वेळ कळविण्यात येईल. शिबिराच्या ठिकाणी नांव नोदविली जाणार नाहीत याची कृपया नोंद घ्यावी.
त्याच प्रमाणे विकलंगासाठी “जयपुर फुट” चे शिबिर घेण्याचा मानस असून किमान १५ नांवे नोंद झाल्यासं या शिबिराचे आयोजन केले जाईल. तरी कृपया गरजुनी आपली नावे ८५५०९७५२४२ या क्रमांका वर त्वरीत नोंदवावी अशी विनंतीही रोटरी क्लबतर्फे करण्यात आली आहे.
