*कोकण Express*
*जिल्ह्यातील सर्व प्रमुख जिल्ह्यातच; गुंतवणूकदारांनी व्हावे निर्धास्त*
*परशुराम उपरकर यांच्या आरोपावर दिले प्रत्युत्तर….!*
*सिंधुदुर्ग*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ई-स्टोअर सुपर बाजार सुरू आहेत. कोणताही बंद करण्याचा हेतू नाही. जिल्ह्यातील प्रमुख जिल्ह्यातच आहेत, अशी माहिती ई-स्टोअरचे महाराष्ट्र-गोवा प्रमोटर शैलेंद्र पेडणेकर यांनी दिली आहे. दरम्यान भारतातील पैसा परदेशात न नेता या ठिकाणी गुंतवणूक सुरू आहे. त्यामुळे कोणाचे नुकसान होणार नाही, अशी खात्रीही पेडणेकर यांनी दिली. याबाबत त्यांनी प्रसिध्दीपत्रक दिले आहे.
काल कणकवली येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मनसेचे नेते परशुराम उपरकर यांनी आरोप केले होते. यात कंपनीच्या कामाबाबत त्यांनी प्रश्नचिन्ह व्यक्त करीत जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी फोन उचलत नाहीत. तसेच सेंटर बंद असल्याचे आरोप केले होते. याला पेडणेकर यांनी कंपनीच्या माध्यमातून आपली बाजू मांडली आहे.

