*कोकण Express*
*खऱ्या शिवसेनेची ताकद जिल्ह्यात दाखवून देणार…!*
*उद्योग मंत्री उदय सामंत यांचा सूचक इशारा…!*
*कणकवलीत शिंदे समर्थक शिवसैनिकांकडून जल्लोषात स्वागत…!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
येत्या आठ- दहा दिवसात मी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा येणार आहे. व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची म्हणजे आमच्या खऱ्या शिवसेनेची सिंधुदुर्गात ताकद काय आहे हे दाखवून देणार आहे. असा सूचक इशारा राज्याचे उद्योग मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी पालकमंत्री उदय सामंत यांनी दिला आहे.
कणकवलीत छत्रपती शिवाजी महाराज चौकात उद्योग मंत्री उदय सामंत यांचे शिंदे समर्थक शिवसैनिकांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदाच आलेल्या श्री सामंत यांच्या स्वागता प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य संजय आंग्रे, माजी नगरसेवक भूषण परुळेकर, भास्कर राणे, शेखर राणे, अतुल दळवी, सतीश हरमलकर, बाबू आचरेकर, सुनील पारकर, नाना सापळे यांच्यासह अनेक शिंदे समर्थक शिवसैनिक उपस्थित होते.

