*कोकण Express*
*शिवसेना पदाधिकार्यांची हकालपट्टी, शिवसेना पदाधिकार्यांच्या नव्याने नियुक्त्य*
*सावंतवाडी ः प्रतिनीधी*
आमदार दीपक केसरकर यांच्या सोबत गेलेल्या अशोक दळवी यांच्या सह शिवसेना पदाधिकार्यांची हकालपट्टी करीत त्या जागेवर आज तडकफडकी नव्याने नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यात शिवसेना शहरप्रमुख म्हणून शैलेश गवडंळकर तर उपजिल्हाप्रमुख व प्रवक्ते म्हणून चंद्रकांत कासार आदींची निवड करण्यात आली आहे.
जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार ही निवड करण्यात आली, असे त्यांनी सांगितले. दरम्यान काही जण गेले तरी शिवसेना अभेद्यच राहील आणि त्यांच्या जोरावर आम्ही पुन्हा एकदा संघटना उभी करू, असा विश्वास तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी व्यक्त केला.
यावेळी महिला संघटक जान्हवी सावंत, चंद्रकांत कासार, शब्बीर मणियार, मायकल डिसोजा, योगेश नाईक,श्रुतिका दळवी, अर्पणा कोठावळे, सुनिल गावडे, गुणाजी गावडे, वेत्ये सरपंच सौ स्नेहा मिठबावकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी जाहीर करण्यात आलेल्या निवडीत शहरप्रमुख माजी नगरसेवक बाबू कुडतरकर यांची हाकलपट्टी करत सावंतवाडी शहर प्रमुख पदी शैलेश गवंडळकर तर उपजिल्हा प्रमुख अशोक दळवी यांच्या जागी उपजिल्हाप्रमुख पदावर चंद्रकांत कासार, महीला उपतालुकाप्रमुखपदी भारती कासार, उपतालुकाप्रमुख पदी आबा सावंत,माजगाव विभाग प्रमुख संजय माजगावकर यांच्या जागी वेत्ये माजी सरपंच सुनील गावडे तर महिला शहर प्रमुख श्रृतीका दळवी, महिला उपशहर प्रमुख प्रगती बामणे, शाखा प्रमुख अनुष्का कलंबिस्तकर, श्रेयस कासार, मनस्वी वाडकर, संगिता पेडणेकर, अनिषा चिले यांची निवड करण्यात आली असल्याचे श्री. राऊळ यांनी जाहीर केले.
यावेळी जिल्हा प्रमुख संजय पडते व महिला संघटक जान्हवी सावंत, तालुका प्रमुख रूपेश राऊळ यांनी शिवसैनिक खंबीर भूमिका घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहून शिवसेना संघटना बांधणी करतील असे सांगितले.

