तुळस श्री देव जैतिर उत्सव मंगलमय – भक्तीमय वातावरणात व भाविकांच्या अलोट गर्दीत संपन्न

तुळस श्री देव जैतिर उत्सव मंगलमय – भक्तीमय वातावरणात व भाविकांच्या अलोट गर्दीत संपन्न

*कोकण Express*

*तुळस श्री देव जैतिर उत्सव मंगलमय – भक्तीमय वातावरणात व भाविकांच्या अलोट गर्दीत संपन्न*

*वेंगुर्ला ः प्रतिनिधी*

तुळस गावचा प्रसिद्ध श्री देव जैतिर उत्सव आज सोमवारी मोठ्या उत्साहात व भाविकांच्या अलोट गर्दीने संपन्न झाला.यावेळी भाविकांच्या व विशेषतः माहेरवाशिणींच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव होते.श्री देव जैतिर देवतेच्या दर्शनासाठी जनसमुदाय लोटला होता.या उत्सवाची तयारी देवस्थान समितीमार्फत गेल्या काही दिवसांपासून सुरु होती.
श्री देव जैतिर मंदिरासमोरील मांडावर येणा-या अवसारी देवाच्या दर्शनासाठी भाविकांनी दुपारपासूनच गर्दी करण्यास सुरुवात केली होती.दुपारी देवघरातून देव मांडावर आल्यावर दर्शनासाठी भाविकांची झुंबड उडाली.त्यामुळे वातावरण भक्तीमय बनले होते.सकाळी श्री देव जैतीराच्या मंदिरामध्ये नेहमीप्रमाणे धार्मिक कार्यक्रम,  पुजापाठ व दुपारपासून मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली.
मंदिरात केळी ठेवणे, नवस बोलणे,नवस फेडणे यासाठी सकाळपासून सायंकाळी उशिरापर्यंत भाविकांनी गर्दी केली होती.भाविक सायंकाळी उशिरापर्य॔त देव दर्शनासाठी मंदीराजवळ येत होते.यावेळी खासदार विनायक राऊत यांनी श्री देव जैतिर देवाचे दर्शन घेतले.यावेळी त्यांचे देवस्थान समिती सचिव विजय रेडकर, तुळस सरपंच शंकर घारे यांनी स्वागत केले.यावेळी संजय पडते,अर्चना घारे, यशवंत उर्फ बाळू परब,अजित राऊळ, सचिन वालावलकर, सुनिल डुबळे, सुनिल मोरजकर, पंकज शिरसाट, मकरंद परब आदींसह पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.११ दिवस चालणाऱ्या या उत्सवाची सांगता ८ जून रोजी कवळास कार्यक्रमाने होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!